बायोडिझेल तस्करीचे पितळ झाले उघडे

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि 21नोव्हेंबर):-नकली डिझेल तयार करून डिझेलच्या भावात विक्री करणाऱ्या आरोपीला केज पोलिसांनी पकडले असता एका आरोपीच्या माहिती नुसार बायोडिझेल नांदेड वरून केजला येत आहे अशी माहिती मिळताच पोलिसांकडून नांदेड या ठिकाणी धाड टाकून बायोडिझेल तयार करणाऱ्या तीन आरोपीला पकडून नांदेड वरुन गंगाखेड मार्ग केज कडे घेऊन जात असताना पालम गंगाखेड रोडवर पोलिसाच्या गाडीचा पाठलाग करीत पोलिसाच्या गाडीत बसलेल्या आरोपीला खाली ओडण्याचा प्रयत्न केला .

माहिती गंगाखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळताच गंगाखेड या ठिकाणी पोलिसांचा सापळा रचून काळ्या रंगाची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्यातील आरोपी सुखासिंग हुंदई, संदीप सिंग हुंदई , परमजित सुखई यांना ताब्यात घेतले त्यांच्या गाडीची तपासणी केली व या तिन्ही आरोपीला परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांनी दिली, या घटनेतील एक फॉर्च्युनर गाडी पोलिसांना चकवा देऊन फरार झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेणिक लोढा व पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या पथकातील सुग्रीव सावंत, सारंग शिंदे प्रवीण कांबळे, कराळे ,कावळे, मुरकुटे यांनी मोठ्या सीताफिने तीन आरोपीला पकडे.बायोडीजेल तयार करणारी टोळी सक्रिय आसुन पोलिस या सर्वांचा पर्दा फाश करणार आहे.