गंगाबाई तलमले महाविद्यालयात संविधान दिन साजरा

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26 नोव्हेंबर):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. सुप्रिया ढोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले हे होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर उद्देशप्रत्रिकेचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्‌घाटक प्रा. सुप्रिया ढोरे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, भारतीय संविधान व्यक्तीला स्वातंत्र्य, समता , बंधूता, न्याय देणारा कवचआहे. प्रमुख अतिथी प्रा. श्रीकांत कळस्कर म्हणाले की,भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एका सुत्रात बांधणारा संविधान ही अनमोल देणगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे.

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, जगातील चांगल्या तत्वाचा समावेश असलेली भारतीय राज्यघटना परीपुर्ण आहे. व्यक्तीला स्व ची जाणीव करून देण्यात संविधान महत्त्वाची भूमिका बजावते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याबाबत जागृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु. पायल ठाकरे तर आभार सुनिल पारधी यांनी मानले कार्यक्रमाला प्रा. जयगोपाल चोले, प्रा. संतोष पिलारे प्रा. हर्षा बगमारे, प्रा. अश्विनी बोरकुटे प्रा. पल्लवी धोंगडे, प्रा. कविता भागडकर, प्रा. ओमादेवी सहारे, प्रा. डिम्पल तलमले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते