उमरखेड येथे भारतीय संविधान दिन साजरा

35

🔸नागरिक,सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचा सहभाग

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधि)मो:;8806583158

उमरखेड – (दि 26 नोव्हेंबर) भारतीय संविधान दिनानिमित्त विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी मिळून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या वतीने हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी एमपीजे जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे /उद्देशिकेचे वाचन करून आपले मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले भारतीय संविधान निर्माण करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

भारत देशांमध्ये विविध जातीची पंथाचे व धर्माचे व बोलीभाषेचे लोक राहतात. या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम फक्त भारतीय संविधानानेच केले त्यामुळेच विविध समाजाला गुण्या – गोविंदाने जगण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय संविधान हे लोकशाही मार्गाने स्वीकारण्यात आले.
आणि आज संपूर्ण भारतीय नागरिक संविधानाच्या जोरावर, संविधानाच्या ताकतीवर आपले हक्क आणि न्यायासाठी लढू शकतो असे प्रतिपादन अन्सारी यांनी केले.

देवानंद पाईकराव रिपब्लिकन सेना जिल्हा कार्याध्यक्ष .सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भिम टायगर सेना . डॉ. फारुख अबरार यांनी सुद्धा आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्यामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना), देवानंद पाईकराव (जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन युवासेना), डॉ. सुनील पाटील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवासेना), शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवासेना) डॉ . फारूक अबरार ( कार्याध्यक्ष, एमपीजे ) यांनी केले होते.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. गजानन दामोदर यांनी केले.

यावेळी विरेंद्र खंदारे (शहाराध्यक्ष सेवादल काँग्रेस), सुमेध नवसागरे (सदस्य ग्राम पंचायत) अ. जहीर (सचिव एमपीजे), मिनाज अहेमद, साबिर शेख, फिरोज पठाण, मुन्ना खान इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.