ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय ल्याहरी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

41

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड प्रतिनिधी)

नांदेड(दि.27नोव्हेंबर):-हदगांव तालुक्यातील ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय ल्याहरी ता. हदगांव जि. नांदेड येथे आज भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधीकारी सौ. चौधरी मॅडम, मुख्याध्यापक सूर्यकांत दुधारे सर , सुनिल पाटील सर, विनायक वाठोरे सर,मिलिंद चौरे सर, दशरथ जीवने, सचिन कांबळे, प्रज्ञा चौरे, भागोराव बोरकर यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकचे सामुदायिक वाचन करण्यात आले. व तसेच चौधरी मॅडम, दुधारे सर, पाटील सर, विनायक वाठोरे सर, दशरथ जीवने यांनी संविधानविषयी आपले विचार मांडले

यावेळी शिक्षण विस्तार अधीकारी सौ. चौधरी मॅडम यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, संविधानातील कलमे, परिशिष्टे, मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन केले.

यानंतर शाळेतील शिक्षक विनायक वाठोरे सर यांनी संविधानामुळे आपला भारत देश अखंड आहे.माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. संविधान आपल्याला शिकवते संविधानाचा आदर करून संविधानाच्या नियमानुसार वाटचाल करावी. संविधानाने स्वातंत्र्य न्याय समता- बंधुता प्रस्थापित केली. आपण सर्वांनी – आपली मूलभूत कर्तव्य पार पाडावीत.

यावेळी शिक्षण विस्तार अधीकारी सौ. चौधरी मॅडम, मुख्याध्यापक सूर्यकांत दुधारे सर , सुनिल पाटील सर, विनायक वाठोरे सर,मिलिंद चौरे सर, दशरथ जीवने, सचिन कांबळे, प्रज्ञा चौरे, भागोराव बोरकर ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय ल्याहरी येतील विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतील सर्वंच शिक्षक वृंद उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चोरे यांनी केले तर आभार सचिन कांबळे यांनी मानले.