सुवर्ण महोत्सवी शाळेत तात्यासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

  38

  ?तात्यासाहेबांचे जीवन कार्य प्रेरणादायी – मुख्या. सौ.पी.आर. सोनवणे

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

  धरणगांव(दि.२८नोव्हेंबर):- २०२१ रविवार रोजी स्थानिय सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे क्रांतिसुर्य – सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

  सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले.
  याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे मॅम , संस्थेचे माजी चेअरमन डॉ.आर.टी. सोनवणे यांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

  याप्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक एम.बी.मोरे, एस.व्ही.आढावे, हेमंत माळी, पी.डी.पाटील , व्ही.टी.माळी, अशोक पाटील, जीवन भोई तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.