दिग्रस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.11डिसेंबर):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ, दिग्रस (र.नं.एफ११९९३)च्या वतीने ७२वा भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक बुध्दविहार पडगिलवार ले -आऊट येथे साजरा करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेविका आयु. कमलताई ढाकणीकर हया होत्या,तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. दिग्रसचे माजी उपाध्यक्ष आयु.गणेश रोकडे, मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा आयु. पंचशीला इंगोले, साहित्यिक आयु.महादेव धुळध्वज(धम्मध्वज) व मंडळाचे अध्यक्ष डॉ. वाल्मिक इंगोले हे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आयु. पंचशीला इंगोले यांनी केले .डॉ. वाल्मिक इंगोले यांनी मार्गदर्शनपर प्रास्ताविक केले. तसेच आयु.महादेव धुळध्वज यांच्या *आपले संविधान* या हस्तलिखाताचे विमोचन करण्यात आले व त्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी ज्यांचे दोन्ही अपत्य वैद्यकीय क्षेत्रात आहेत.असे कुटुंब आयु.संध्या बबन मनवर व आयु.सविता श्याम विणकरे या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार आयु.रवी तुपसुंदरे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका आयु. मेघा खडसे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्टेज कार्यक्रमानंतर महिला मंडळाद्वारे बी.सी.योजना,विपश्यना प्रात्यक्षिक,नेतृत्वक्षम महिलांचा सत्कार,गीतगायन व प्रबोधनपर मार्गदर्शन असे अनेकविध उपक्रम घेण्यात आलेत.यानंतर कार्यक्रमाची सांगता सरणत्तय गाथेने करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.