नाशिक कसारा एसटी बसवर दगडफेक काचा फुटून बसचे नुकसान

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.12डिसेंबर):- -धावत्या एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना महामार्गावरील उड्डाणपुलावर घडली या घटनेत एसटी बस ची पुढील काच फुटून नुकसान झाले असून चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ताब्यातील वाहन रस्ते गडेला घेतल्याने अनर्थ टाळला याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष डेव्हिड धांडे वय 54 राहणार इगतपुरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

धाडे शनिवारी दिनांक 11 सकाळच्या सुमारास नाशिक कसारा या बसवर या बसवर सेवा बजावत असताना ही घटना घडली एम एच 40 वाय 59 73 या बसमध्ये प्रवासी भरून ते कसारा च्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावर ही घटना घडली मामाचा ढाबा समोरून बस जात असताना उड्डाणपुलावरील दुभाजकमध्ये लावलेल्या शो झाडांमधून अज्ञात समाजकंटकांनी बसवर दगडफेक केली या घटनेत बसची पुढील काच फुटून सुमारे पाच हजार रुपयाचे नुकसान झाले असून पुढील तपास हवलदार कोकाटे करीत आहे