आ.गुट्टे यांच्या हस्ते मौजे ईसाद येथे कलशारोहन व भूमिपूजन सोहळा संपन्न

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18डिसेंबर):-तालुक्यातील श्री दत्त जयंती निमित्त मौजे इसाद ता. गंगाखेड येथे मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते कलशारोहण व आमदार स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. इसाद येथे दत्त जयंतीचे औचित्य साधून सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हभप दत्तात्रय महाराज पुरी बोर्डेकर यांच्या अमृतवाणीतून गुरूचरित्र पारायणाचे वाचन, कथन व प्रवचन करण्यात आले होते. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजे इसाद येथील दत्त संस्थांना करिता सभामंडप बांधण्यासाठी १० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता.

आजच्या शुभ दिनी सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा व दत्त मंदिर कलशारोहन कार्यक्रम आमदार गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी श्री दत्त संस्थान इसाद चे महंत शंकरबन महाराज, ह.भ.प. दत्तात्रय महाराज पुरी बोर्डेकर,जि.प.सदस्य किशनराव भोसले,सरपंच उद्धवराव सातपुते,चेअरमन रामप्रसाद सातपुते,उपसरपंच नितीन भोसले, गटनेते राजेभाऊ सातपुते,कवी विठ्ठल सातपुते, भगवानराव सातपुते,दिगंबर आबा सातपुते, भोजराव नाना सातपुते,सुभेदार विश्वनाथ सातपुते, भानुदास भोसले,भिमराव भोसले,माऊली भोसले,माऊली पांचाळ, विठ्ठल चेअरमन,सखाराम सातपुते,आ.डी.भोसले, परसराम राठोड यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.