ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास राज्य व केंद्र सरकार टाळाटाळ करतय – आ.महादेव जानकर

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19डिसेंबर):-ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती गंगाखेड चे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु असून धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.महादेव जानकर यांनी धरणे आंदोलन स्थळास भेट देऊन उपस्थितांना संबोधित केले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय प्रतिनिधित्वाचे आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य व केंद्र सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. आरक्षण देण्यास दोन्ही सरकारची इच्छा नसुन यांना केवळ ओबीसीचे मतदान पाहिजे.

यावेळी त्यांनी देशातील भाजप सरकार व कॉंग्रेस वरही जोरदार टीकास्त्र सोडले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी असतानाही ते ओबीसींना आरक्षण देण्यास का असमर्थ आहेत ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. रासप ला अधिकाअधिक ताकद द्या आपल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक आपसूक होईल असेही ते यावेळी म्हणाले. ओबीसीला राजकीय आरक्षण पाहिजे असेल तर मराठा समाजा सारखे मोठे व शांततेने मोर्चे काढावे लागतील तेव्हा कुठे सरकारला जाग येईल.

याबाबतीत राष्ट्रीय समाज पक्ष सदैव ओबीसींच्या सोबत असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मी मागील सरकारमध्ये असताना केवळ दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून पशु गणना केली होती. आताही ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी केवळ पाच कोटी रुपयांची आवश्यकता असतानाही हे सरकार टाळाटाळ का करत आहे ? याबाबतीत मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मा. शरदचंद्रजी पवार यांनाही दोन वेळेस भेटलो.

ओबीसीचे जनरल जातिनिहाय जनगणना करत करत नाही.१)ओबीसी इम्पॅरिकल डाटा एक महिन्याच्या आत सादर करावा २)ओबीसीचे राजकीय, नोकरीतील व शैक्षणिक आरक्षण रद्द करू नये अशा विविध मागण्यासाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विचार मंचावर गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे,जि.प.सदस्य प्रल्हादराव मुरकुटे, राजेश फड, सभापती मुंजाराम मुंडे, कृष्णाची सोळंके, हनुमंत मुंडे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, नितीन बडे, मगर पोले, विलास गाढवे,शेख खालिद भाई, ब्रिजेश गोरे, इंतेसार सिद्दिकी, छोटू कामत, संभुदेव मुंडे, राजेभाऊ बप्पा कदम, प्रल्हाद शिंदे, प्रदीप शिंदे, प्रताप मुंडे,सतीश घोबाळे, वैजनाथ टोले, गोविंद सानप,महावीर गाडे, इक्बाल चाऊस,सुंदर मुंडे, भास्कर ठावरे, बळीराम मुंडे, निवृत्ती भेंडेकर,रामेश्वर भोळे, प्रकाश नागरगोजे, गोविंद मानवतकर, विशाल दादेवाडा, बालाजी मुंडे आदी उपस्थित होते.