आ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते मरडसगाव येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20डिसेंबर):-मौजे मरडसगाव ता. गंगाखेड येथे स्थानिक आमदार विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते व जि.प. सदस्य प्रल्हादराव मुरकुटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी दत्त संस्थान व महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयासही भेट दिली.

याप्रसंगी सोसायटी चेअरमन बाबाराव शिंदे, माजी सरपंच वैजनाथराव काळे, मुंजाभाऊ काळे, गंगाखेड खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष साहेबराव शिंदे, सरपंच विक्रम काळे, संजय काळे, भारत बडवणे, यशवंत काळे, ए. बी .शिंदे, चक्रधर शिंदे, विनायक बडवणे, यांच्यासह गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.