धक्कादायक! गावगुंडानी मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिले

33

🔺गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील घटना

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22डिसेंबर):-मध्यरात्री घरात कुणी नसल्याचे बघून, गावगुंडांनी पेट्रोल ओतुन घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना, गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे उघडकीस आली आहे.
यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आता माझ्या लेकरांना खायला काय घालू….असे म्हणत पीडित महिलेने टाहो फोडला आहे. या २ दिवसापूर्वी घडलेल्या घटनेने, जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून पीडित महिलेच्या तक्रारी वरून, पवन जगन्नाथ खाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, घरातील सर्व काही जळून गेले आहे. आता माझ्या मुलांना कसं जगवू? असा टाहो गीता राऊत यांनी फोडला यावेळी तिला शब्द फुटत नव्हते. गेवराई तालुक्यातील रोहितळ गावात राहणाऱ्या मच्छिंद्र राऊत यांचे सलूनचे दुकान आहे. ते गावात मध्येच पत्नी आणि २ मुलाबरोबर राहतात. गावात पवन जगन्नाथ खाडेबरोबर किरकोळ भांडण झाले होते. त्यांनतर मच्छिंद्र आणि त्याची पत्नी आणि मुले माहेरी निघून गेले होते.

यादरम्यान भांडणाचा राग मनात धरून पवन खाडे याने, मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास दरम्यान दरवाजातुन पेट्रोल ओतले, त्यावेळी मच्छिंद्रचा मोठा भाऊ गोरख याने अडवण्याचा प्रयत्न केला. हाता पाया पडून देखील सांगितले पण, आडवे आला तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तुझे मुले आणि मुलगी दररोज शाळेत ये- जा करतात, मी काहीही करेल, अशी धमकी पवन खाडे यानी दिली. असे गोरख गणपत राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये पवन जगन्नाथ खाडे विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पवन खाडेला पोलिसांनी काल अटक काण्यात आली आहे.