वंचित बहुजन आघाडी जालना च्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद उत्साहात संपन्न

28

✒️अतुल उनवणे(जालना प्रतिनिधी)

जालना(दि.26डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने जयनगर जालना येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनंदा तिडके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे हे होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अँड कल्पना त्रिभुवन, सौ रेखा प्रेमदास खिल्लारे होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक रमाताई होर्शिळ, मैना खंडागळे, शिल्पा वीर, सुस्मिता राऊत, जया आठवले, सुहासिनी कांबळे या होत्या.प्रथम स्रियांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व हक्क अधिकार देणारे मनुस्मृती दहन करून भारतीय स्त्रीला गुलामगिरी बंधनातून मुक्त करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिपाने धुपाने आणि पुष्पाने पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्राचार्य तिडके मँडम म्हणाल्या की माझी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी आहे आणि तुमची सुद्धा असायलाच हवी कारण स्रिला खरे हक्क अधिकार देणारे एकमेव डॉ बाबासाहेब आंबेडकरच आहेत म्हणून आपण त्यांचे विचार आत्मसात करून जगले पाहिजे जुन्या रूढी परंपरा मनातून काढून टाका किंवा जाळून टाका हेच आजच्या भारतीय स्त्री मुक्ती परिषद दिन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

यावेळी प्राचार्य सुनंदा तिडके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, रमाताई होर्शिळ, अँड कल्पना त्रिभुवन, रेखा खिल्लारे मैना खंडागळे, प्रा संतोष आढाव, शिल्पा वीर, सुस्मिता राऊत, जया आठवले, कैलास रत्नपारखे, रामदास दाभाडे, गोपाल गावडे, मिलिंद पारखे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, अर्जुन जाधव, अमोल लोखंडे, सुहासिनी कांबळे, सिमा सदावर्ते सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा सदावर्ते तर अभार सुस्मिता राऊत यांनी केले.