उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार देवेंद्र भुयार यांना नवीन वर्षाचे गिफ्ट !

42

🔹पुरवणी अर्थसंकल्पामध्ये १६३ कोटी २७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.2जानेवारी):- विधानसभा मतदार संघामध्ये विविध विकसकामांकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना २०२१ – २२ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये १६३ कोटी २७ लक्ष रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून नवीन वर्षाचे गिफ्ट दिले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.आ. देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली होती. त्यावेळी मोर्शी वरुड तालुक्यातील विविध विकासकामे करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना दिला होता.

हा शब्द उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाळला असून आमदार देवेंद्र भुयार यांना सन २०२१ – २२ पुरवणी अर्थसंकल्पामध्ये वरुड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारतीचे बांधकामाकरिता ५० कोटी २३ लक्ष रुपये. मोर्शी येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे करीता ४९ कोटी २३ लक्ष रुपये. शेंदुरजना घाट येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम करणे करीता १६ कोटी ५ लक्ष रुपये, मोर्शी वरुड येथील रुग्णालयामध्ये फायर फायटिंग यंत्रणा बसविणे ५० लक्ष रुपये, मोर्शी तालुक्यातील ५ मंडळ अधिकारी कार्यालये, २१ तलाठी कार्यालये तथा निवासस्थानाचे बांधकाम करणे ४ कोटी ६० लक्ष रुपये.वरुड तालुक्यातील झटामझीरी शेकदारी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी रुपये, बारगाव ते जामगाव रस्ता बांधकाम करणे १ कोटी रुपये, खडका जामगाव माणिकपूर पळसोना गव्हाणकुंड भेमडी झटामझीरी रस्त्याची सुधारणा करणे ७ कोटी ३४ लक्ष रुपये, एकलविहिर लिंग करवार रस्त्यासाठी भूसंपादन करणे १ कोटी ५० लक्ष रुपये.
मोर्शी तालुक्यातील चिखल सावंगी, चिंचोली गवळी रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे २ कोटी २८ लक्ष रुपये. हिवरखेड ममदापूर लोणी हातूर्णा रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे ७० लक्ष रुपये. पार्डी, पिंपळखुटा, नया वाठोडा लिहिदा, नेरपिंगळाई रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे ३ कोटी ६३ लक्ष रुपये. राजूरवाडी भांबोर पिंपळखुटा तळणी रस्त्याची मोऱ्यासहित सुधारणा करणे २ कोटी ३० लक्ष रुपये. रिद्धपुर आष्टोली तरोडा खेड अंबाडा रस्त्याची मोऱ्यासाहित सुधारणा करणे ७ कोटी ८५ लक्ष रुपये. आष्टगाव अंबाडा करजगाव घटलाडकी रस्त्याची सुधारणा करणे , सायवाडा ते आष्टगाव पर्यंत लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लक्ष रुपये. नसितपूर, येवती, पुसला, नेरपिंगळाइ रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करणे २ कोटी ६० लक्ष रुपये. यासह विविध विकसकामांकरिता आमदार देवेंद्र भुयार यांना पुरवणी अर्थसंकल्पामध्ये १६३ कोटी २७ लक्ष रुपयांचा भरघोस विकास निधी मंजूर करून देण्यात आला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मोर्शी वरुड तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आमदार देवेंद्र भुयार यांना मोठे गिफ्ट मिळाल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.