उमरखेड येथे कलम 144 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन

37

🔹यावेळी नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6जानेवारी):-शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात संचारबंदी करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारची दंगल घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले.

उमरखेड येथे त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले तर उमरखेड शहरातही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वागत केले.गेली अनेक वर्षे शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणी संघर्ष समिती करत आहे.त्याचे नेतृत्व पत्रकार विलासराव चौहान व त्यांचे सहकारी करत आहेत.

पाच वर्षे पूर्ण झाली पण आश्वासनाची पूर्तता केली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही, त्यामुळे आज नागरीकांमध्ये नाराजी आहेआज पुतळा शहरात आला आणि सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषदेत पुतळा ठेवण्यात आला.आता कधी होणार हा प्रश्न आहे. अखेर शिवाजी चौकात पुतळा बसवणार शिवसमर्थक पुतळा लावणार की शहरात पुन्हा गलिच्छ राजकारण जिंकणार आणि वर्षानुवर्षे शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा अशीच धूळ खाणार…?