परिवर्तन बौद्ध महिला मंडळातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

26

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹विधवा महिलाचा साडीचोळी सत्कार

घुग्घुस(दि.6जानेवारी):-दि.३जानेवारी २०२२ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती परिवर्तन बौद्ध महिला मंडळ नकोडा तर्फे साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर शहर महिला आघाडी संघटीका आदरणीय वंदनाताई हातगावकर, भाग्यश्री हांडे शहर युती प्रमुख, कल्पना शिंदे दिव्यांग बांधव शहर संघटिका, सविताताई दंडारे बंगाली समाज संघटिका,आशाताई देशमुख वार्ड शहर प्रमुख व वैशालीताई मेश्राम आदिवासी संघटिका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.प्रमुख पाहूण्याचा हस्ते द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी असलेल्या आदरणीय वंदनाताई हातगावकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांचा हस्ते विधवा महिलांचा साडीचोळी देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला परिवर्तन बौद्ध महिला मंडळाचा अध्यक्षा व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.रंजनाताई झाडे,मंडळाच्या सचिव सौ.पुष्पांजली काटकर, मंडळाचा उपाध्यक्ष सौ.शोभाताई रंगारी, कोषाध्यक्ष सौ.माधवी भगत, सदस्य सौ.भारती ठमके, सौ.उज्वला ठमके, सौ.किरण कांबळे,सौ.उज्वला पाटील, सौ.संघरत्ना ठमके व सौ.वंदना लोहकरे आणी जेष्ठ महिला नागरिक श्रीमंती मालाताई पैंदोर, मिराबाई कुळे तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ.ममताताई मोरे तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई झाडे यांनी भविष्यात विधवा वृद्ध महिलासांठी वृध्दाश्रमाची संकल्पना जाहीर केली अशाप्रकारे कार्यक्रमाचे अध्यक्षा आदरणीय वंदनाताई हातगावकर यांचा अध्यक्षिय भाषणानंतर परिवर्तन बौध्द महिला मंडळाच्या कोषाध्यक्ष सौ.माधवी भगत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आणि अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता झाली.