शरद पवारांनी अण्णाभाऊ साठे यांच्या परिवाराला वंचित ठेवला 30 वर्षे का झोपले होते का धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावे –दिपक थोरात

24

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.7जानेवारी):-थोर साहित्यीक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महामानव आणि थोर महापुरुष आहेत … याविषयी कोणाचेही दुमत नाही. दुमत असण्याचे काही कारणही नाही. केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या सूचीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याने देशभरात मोठे वादंग निर्माण झाले आहे. यापूर्वी हि बाब भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांना दिलेले आहे. वरील वस्तुस्थिती खरी असली तरी आता याबाबतची कारणमीमांसा शोधून वादंग निर्माण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या महानते विषयी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा.

आणि सर्व पक्ष संघटनांच्या प्रमुख मंडळींनी याबाबत पाठपुरावा करून जागतिक दर्जाचे साहित्यीक, विचारवंत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांचा सन्मान करावा…. अशी सर्व बांधवांना नम्र व कळकळीची विनंती आहे.आणि मातंग समाजातील नागरिक व अण्णा भाऊ साठे यांच्या परिवारातील सदस्य आजही वंचित आहेत याला शरद पवार जबाबदार आहेतआणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मातंग समाजाची दिशाभूल करू नये असे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्य सचिव दिपक थोरात प्रसिद्धी पत्रकाद्वारे यांनी म्हटले आहे