उमेद च्या माध्यमातून महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल – संजय गजपुरे

32

🔸कोथुळणा येथे महिला ग्रामसंघाच्या वतीने आठवडी बाजाराचे उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.10जानेवारी):-तालुक्यातील कोथुळणा येथे सावित्री ग्रामसंघाच्या वतीने आयोजित आठवडी बाजाराचे उद्घाटन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कोथुळणा च्या सरपंच सौ.मंजुषाताई डाहारे होत्या.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या या आठवडी बाजारातून स्थानिकांना सोयीचे होणार आहे. उमेद मार्फत तालुक्यात महिला बचत गट व ग्रामसंघाच्या वतीने अनेक छोटे उद्योग सुरु झाले असुन यात काम करणाऱ्या महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले व घरची कामे सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत तयार करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या सावित्रीबाईंच्या लेकींचे भरभरून कौतुक केले.

याप्रसंगी कोथुळणा चे उपसरपंच रोशन कुर्झेकर , कोटगाव चे उपसरपंच यशवंत भेंडारकर , मौशी – कान्पा लक्ष प्रभाग च्या अध्यक्ष सौ.अनिताताई बांबोळे ,सावित्री ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ.सुषमाताई जांभुळे , सचिव सौ.आशाताई डाहारे ,कोषाध्यक्ष सौ.किरणताई हुमणे , ग्रामपंचायत कोथुळणा चे सदस्य बंडुभाऊ शेंडे , दौलत शिवणकर, सौ.कुसुम नान्हे , सौ.दिपेश्वरी रामटेके , सौ.छायाताई मेंढे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेद चे तालुका व्यवस्थापक अमोल मोडक यांनी केले. संचालन प्रफुल्ल बारसागडे यांनी केले तर आभार कान्पा – मौशी प्रभाग समन्वयिका कु.ज्योती साळवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेद चे प्रभाग समन्वयक दिपक गायकवाड , शुभम देशमुख व गजानन गोहणे यांनी प्रयत्न केले.