पाटोद्यात दरोडेखोरांचा देवाच्या मळ्यात हैदोस,नाईकनवरे कुटुंबाला प्रचंड मारहाण; चार गंभीर जखमी

32

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.12जानेवारी):-सात ते दहा दरोडेखोरांनी पाटोदा शहरात लाठ्या-काठ्या, गजांनी मारहाण करत दहशत माजवून लुटालूट केल्याची घटना रात्री घडली. शेतकरी तुकाराम नाईकनवरेंच्या देवाच्या मळ्यात असलेल्या घरावर हल्ला चढवून घरातील सदस्यांना मारहाण करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड पळवून नेली. मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे नावाच्या व्यक्तीच्या घरीही असाच धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मोठा ऐवज लुटल्याचे सांगण्यात येते.

नाईकनवरे यांच्या घरी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. 13 वर्षाच्या चक्रपाणी नावाच्या मुलाने दरोडेखोरांना काय न्यायचे तर न्या, परंतु मारहाण करू नका, असे म्हटल्यानंतर तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी घरात कोंडून सोडून दिले.प्रतिकार करणार्‍या गणेश नाईकनवरेला मात्र प्रचंड मारहाण केल्याने उपचारासाठी चौघांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आतील दरवाजा वाजवला.

तुकाराम यांची सून गिता हिने दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी तिच्या डोक्यात काठीने जबर वार केला.लक्ष्मीबाईला घरातून फरफटत नेत शेतातील मकाच्या शेतात फेकून दिले. दरोडेखोरांचा हा धुमाकूळ तब्बल एक तास सुरू होता. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने आणि 70 कट्टे विकलेल्या तुरीची काल पट्टी आली होती. ती रोख रक्कम लुबाडून दरोडेखोर पसार झाले.