जेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांची मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

27

✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.19जानेवारी):-तालुक्यातील मौजे पाटोदा येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र तथा जनसामन्याचे मनमिळवू व्यक्तीमत्व असलेले सामाजिक चळवळीतील वैचारिक नेतृत्व जेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांची नुकतीच मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष प्रा.बाबा उगले यांच्या हस्ते देण्यात आले आले असून सदरची निवड प्रक्रिया महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिष्ठान नरसी येथील सभागृहात पार पडली आहे

नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा पत्रकारितेची बुलंद तोफ ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांची मागासलेल्या मराठवाड्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तालुक्यातील एका नामांकित पत्रकारांची मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यामुळे नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातून पत्रकार गंगाधर ढवळे यांचे अभिनंदन करण्यात येत असून या निवडीचे पत्र पुढील यांच्या कार्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम पार पडावी म्हणून बहाल करण्यात आले असून ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे हे जनसामान्य माणसात मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असल्यामुळे अशा या सामाजिक कार्यकर्त्यांची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन पत्रकाराना नियुक्तीपत्र देऊन नुकताच सन्मान करण्यात आलेला आहे
—— —– —- – —
पाटोदा येथील एका जेष्ठ पत्रकाराची अभिनंदनीय निवड…

तालुक्यातील मौजे पाटोदा येथील रहिवासी असलेले गंगाधर ढवळे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काम केले आणि समाजाची बांधिलकी जपत समाजकार्यात सक्रिय सहभाग घेऊन जनसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांनी करत असल्यामुळे त्यांना मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून या निवडी दरम्यान कार्यक्रमाच्या व्यासपीठावर यावेळी प्रवक्ते राम गायकवाड जिल्हाध्यक्ष,आनंदराव रुमाले, जळबाजी गवळे, विजय सूर्यवंशी, संभाजी वाघमारे माधव धडे कर अनिल ढवळे, मौला पटेल, विठ्ठल मानेमोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पत्रकाराची उपस्थित होते.