आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री खु ता. धरणगाव येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न

26

🔹तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातुन इतरांचे आरोग्य जोपासले जाते – तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.19जानेवारी):- पिंप्री खु.येथील आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री खु ता.धरणगाव येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न झाले . यावेळेस प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे सर हे उपस्थित होते. कोविड १९ बाबतीत यावेळी मार्गदर्शन करत असताना , तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे प्रतिपादन डॉ सोनवणे सर यांनी केले. प्रसंगी डॉ.गिरीश पाटील सर वैद्यकीय अधिकारी , डॉ.मयूर हिवरकर सर समुदाय आरोग्य अधिकारी ,आशा लोखंडे आरोग्य सेविका ,पुष्पा पढयार कविता चौधरी आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी ,आदी सर्व उपस्थित होते .

सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.यावेळी पालकवर्ग सौ.वैशाली अहिरे ,सौ. मालती पाटील आदी उपस्थित होते. लसीकरण साठी सॊ. व्ही.एम.चौधरी मॅडम ,आर. आर. पावरा, आर.एस.पाटील, एस. के. शिंदे , एस.ए पटेल , जे.एस.पाटील, सचिन पवार, लिपिक सौरभ देसले , कर्मचारी सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील आदींनी कोविड नियम पालन करत लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर. एस.पाटील सर यांनी केले.