हात धरुन लाँकअप मध्ये ढकलणारे पी.आय नांदेडकर वर कारवाई करा-सौ.गौरी कुलकर्णी

15

*जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांचेकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल*

जालना(अतुल उनवणे,जिल्हा प्रतिनिधी)

अंबड शहरातील सौ.गौरी पंकज कुलकर्णी यांनी दि .१ ९ .०६.२०२० जिल्हा पोलीस अधिक्षक जालना यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली असून तक्रारीत म्हटले आहे की
, मी अंबड येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहे दि .१८.०६.२०२० रोजी सायंकाळी अंबड शहरात पऊस सुरु होता साधारणपणे आठ साडे आठ वाजता माझ्या पतीच्या मोबाईलवरुन मला माझ्या मोबाईलवर फोन आला पतीचा नंबर असल्यामुळे मी फोन उचचला असता मला पोलीस स्टेशनला तु लवकर ये एवढेच ऐकु आले व फोन कट झाला म्हणुन मी तात्काळ पोलीस स्टेशनला गेले तेव्हा माझ्या पतीला लॉकअप मध्ये उघडे करुन मारहाण चालु होती , सदर प्रकार मी पाहीला तेव्हां नांदेडकर यांना माझ्या पतीला का मारता त्यांना हदय विकाराचा त्रास आहे . त्यांच्या लंग्जवर उपचार सुरू आहे . आशा मारल्यामुळे माझे पती मरुण जातील त्यांना सोडा अशी विनंती करू लागले तेव्हा नांदेडकर फक्त माझ्याकडे पाहुन माझ्या मनाला लज्जा वाटेल अशा तुच्छ भावनेने हसु लागले तेवढयात माझे पती देशुध्द पडले म्हणुन मारहाण करणारे शेजुळ व चव्हाण लॉकअपच्या बाहेर आले . मी नांदेडकर यांना माझ्या पतीला का मारले असे विचारत होते तेव्हा नांदेडकर यांनी शेजुळ व चव्हाणला हिच्या दोन मुसकाटात देऊन हिला देखील तीच्या ढेडग्याच्या बाजुला उचलुन लॉकअपमध्ये फेका असे म्हणाले आणि माझ्याकडे पाहुन अश्लिल हातवारे करुन माझ्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य नांदेडकर यांनी केले . नांदेडकर यांच्या सांगण्यामुळे शेजुळ व चव्हाण यांनी माझ्या मनाला लज्जा वाटेल अश्या पध्दतीने माझा हात धरुन मला लॉकअपकडे ढकलले व त्या दोघांनी देखील अश्लिल शेरेबाजी करुन , हातवारे करुन तुझ्या धेडग्याला काय झाले बघ , मेला असेल तर घरी घेऊन जा असे म्हणुन मला अपमानीत केले . तरी सदर प्रकरणाची चौकशी करुन मला न्याय द्यावा असे म्हटले आहे
सौ.गौरी पंकज कुलकर्णी यांनी निवेदनाची प्रत१. मा.पोलीस महानिरीक्षक साहेब , औरंगाबाद . ‘ २. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब , अंबड ३. मा.अध्यक्ष , मानवी हक्क आयोग , महाराष्ट्र राज्य ४. मा.गृहमंत्री , महाराष्ट्र राज्य ५. मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य ६. मा.मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य ७. मा.विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य विधान सभा सर्वांना माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर अशा विनंतीसह पाठवली असुन सौ.गौरी कुलकर्णी ह्या माजी आमदार कै.भालचंद्र कुलकर्णी यांच्या नातसुन असुन अंबड शहरातील प्रतिष्ठित अशा कुलकर्णी परिवारातील महिलेसोबत अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी असभ्य वर्तन केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

पी.आय नांदेडकर यांची वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख आहे पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्रारदार, सामान्य नागरिक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांना अरेरावी करणे,अरेतुरे बोलणे,कोणतीही घटना व्यवस्थित ऐकून न घेता थेट शिवीगाळ करतात,कधीकधी मारतात न्यायालयाने पोलीसांची नागरिकांना द्यावयाच्या वागणुकीची अमलबजावणी करण्याऐवजी ते मनमानी पणे वागतात त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक अन्याय सहन करतात मात्र पोलीस स्टेशनला जाणे टाळतात.

पी.आय नांदेडकर यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी होतात मात्र वरिष्ठ तक्रारीवर कारवाई करीत नसल्याने नांदेडकरांची दादागिरी वाढली आहे त्यांची भिती गुन्हेगारांना वाटायला होती मात्र गुन्हेगार मोकाट आणि सर्वसामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत असून जिल्हादंडाधिकारी जालना यांनी कायदा आणि सुव्यवस्था तसेच जनतेच्या न्यायीक अधिकाराच्या रक्षणासाठी पी.आय नांदेडकर यांच्या जाचातुन अंबडकरांना मुक्त करावे अशी मागणी जोर धरीत आहे.