दिल्ली येथे कृषिजीवी सन्मान पुरस्काराने रुपेश वाळके सन्मानीत !

40

🔹आयुर्वेद आचार्य बाळकृष्ण यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.28जानेवारी):-विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांना नुकतेच जल संरक्षण व कृषी क्षेत्रामध्ये जण उपयोगी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल दिल्ली येथे नीती आयोगाचा आदर्श जलग्राम कृषिजीवी सन्मान पुरस्कार नीती आयोगाचे सल्लागार अविनाश मिश्रा, केंद्रीय टेक्स्टाईल्स मंत्रालय सचिव जलशक्ती मंत्रालयाचे माजी जलसचिव यू. पी सिंह, जलऋषी स्वामी चिदानंद सरस्वती, वन औषधी तज्ञ आचार्य बाळकृष्ण महाराज, जलग्राम जखनी येथील उमाशंकर पांडे, यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील ‘जल संवाद’ कार्यक्रमामध्ये कृषी कर्मयोगी कृषीजीवी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी – वरुड तालुक्यात प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून रुपेश वाळके यांची ओळख असून शेतकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारे रुपेश वाळके यांनी शेतीमध्ये दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली. याबरोबरच संत्रा शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.सोबतच आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन या संस्थेमध्ये तालुका समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करून, जलसंधारणाचे महत्व हजारो नागरिकांना समजावून सांगुण , हजारो नागरिकांचे मनसंधारण करून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करण्यासाठी हजारो गावकऱ्यांना एकत्रित करून पाण्यासाठी चळवळीत सहभागी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून समाजसेवेचा वसा घेतलेला असून त्यांची संत्रा शेतीशी जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला जिव्हाळा शेती व्यवसायाकडे घेवुन गेला.

यासोबतच त्यांनी नरखेड तालुक्यामध्ये भीषण पाणी समस्या निकाली काढून अनेक गाव पाणीदार करण्यासाठी शेतकऱ्यांना पानलोटांचे उपचार कसे व कुठे करावे याबद्दल हजारो शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून , माती परीक्षण, शोष खड्डे, आग पेटी मुक्त शिवार, जल बचतीचे कार्य, सेंद्रिय शेती, जलसंधारनासह, मनसंधारण, यासह खेळांच्या माध्यमातून बौद्धिक ज्ञान, यासह विशेष महत्वाचे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे महत्वाचे काम केले आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून माती परीक्षण करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करून विविध गावामध्ये असे उपक्रम राबवून आपले समाजकार्य करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या कार्याची दखल घेऊन दिल्ली येथे नीती आयोगाचा कृषीकर्मयोगी कृषिजीवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.