सांगा ना ! तो चुकला कुठे ?

122

मार्शल एक उत्कृष्ट लेखक कवी…. त्याचे लेख, कविता काळजाला भिडणारे….. मार्शलचे साहित्य महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रामध्ये आजही प्रकाशित होत असतात. अशातच मार्शलचा 2015 मध्ये “चुकलो मी” नावाचा आर्टिकल संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झाला. ह्याच आर्टिकलामुळे मार्शलचे नाव महाराष्ट्रात गाजले आणि अनेक नामवंत साहित्यिक मंडळींकडून त्याचे कौतुक केले गेले. मार्शल शांत स्वभावाचा, अत्यंत गरिब परिस्थितीत लहानाचा मोठा झाला. व उत्कृष्ट लेखन करु लागला. तीन वर्षांपासून…. अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थाकडून….. मार्शलच्या साहित्याची दखल घेऊन….. समाजसेवा, युवा भुषण , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, द बेस्ट स्टोरी रायटर, (नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवार्ड), अहिल्याबाई होळकर जिवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट साहित्यिक, काव्य रत्न, साहित्य गौरव, समाजरत्न…… अशा कितीतरी पुरस्काराने मार्शल ला आजवर गौरविण्यात आले.

2015 मध्ये “चुकलो मी” ह्याच आर्टिकलाने मार्शल ला सर्वत्र प्रसिद्धी मिळवून दिली. ह्या आर्टिकलच्या माध्यमातून अनेकांनी संवाद साधला व मित्रत्वाचे नाते जुळले गेले. “चुकलो मी” आर्टिकल ला प्रतिसाद देताना…. मार्शल ला 47 मुलींनी प्रपोजही केलं होतं. त्या सर्वच मुलींना मार्शलने नकार दिला. कॉलेज लाईफमध्ये कधीही मुलींशी न बोलणारा मार्शल….. साहित्य क्षेत्रात उतरला नी उतरला आणि अनेकांशी बोलणे सुरू झाले आणि मग मार्शलची नकळत नाशिक शहरातील प्रणाली नावाच्या एका मुलीशी मैत्री जुळली. कालांतराने प्रणालीने मार्शल ला प्रेपोज केलं व मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही. मात्र ते प्रेम होत की, एकतर्फी प्रेम होतं हेही कळलं नाही.

सुख, दुःखानी भरलेल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या अनोळखी वळणावर….. कोण, कोणाला, कसा आणि केव्हा भेटणार हे मात्र कोणीच सांगू शकत नाही.मार्शलच्या शांत आयुष्यामध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्तीने येऊन धडक मारावी आणि त्यामध्ये मार्शलचा चकणाचुर व्हावा अगदी तशीच मार्शलची व्यवस्था झाली. तो आज आयुष्य जगतो आहे. पण एका मेलेल्या मुळद्याप्रमाणेच….. ना त्याला जिवन जगण्याची आशा…… ना जीवनात धडपडण्याची कुठलीही मनीषा. आज तो जीवन जगतोय. ते त्याला मोठ्या अपेक्षेने लहानाचं मोठं केलं त्या जन्मदात्या आईला आणि दोन बहिणींना सतत हसतमुख ठेवण्यासाठी…… आणि स्वतः मात्र आज तो त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये दिवसेंदिवस संपतच चालला.अशा कितीतरी भौतिक सुविधा मार्शलच्या मागे धावताहेत. पण कुठेतरी तो दिशाहीन होऊन बसला आहे. पण का ? काय चुकलं मार्शलचं ? या स्वार्थी दुनियामध्ये किंमत ठोस्यास ठोसा मारणा-यांचीच होते ? हे मात्र तेवढेच सत्य…. कुठे आणि काय चुकलं असेल त्या बिचाऱ्याचं ? त्याने तर नि:स्वार्थी प्रेम केलंय तिच्यावर…..‌ तिच्या आणि तिच्या मम्मी पप्पांच्या म्हणण्याप्रमाणे वागूनही बिनसलं तरी कोठे ? हो खरंच चुकलं त्याचं की, कित्येक रात्री आणि दिवस दोघांनी एकत्र काढून सुद्धा मार्शलच्या निर्मळ प्रेमाच्या नात्याला अपवित्रता लाभली.

सन्मानाने आणि रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून घ्यावे. म्हणून त्यांने दिवाळीमध्ये आपली आई, ताई, दाजी यांना सोबत घेऊन तिच्या घरी गेला. चंद्रपूर ते नाशिक 600 – 700 कि.मी. चा प्रवास करून तिच्या घरी साईनाथ नगरला जाऊन लग्नाची रीतसर मागणी घातली. तिच्या मम्मी – पप्पा, भाऊ यांनी होकारही दिला. नंतर फेब्रुवारी 2019 मध्ये तिचे मम्मी-पप्पा , मोठा भाऊ हे मार्शलचं घर बघायला त्याच्या गावात गेले. प्रणालीच्या मम्मी-पप्पांनी त्या दोघांच्या लग्नाला हिरवा सिग्नल दिला. आय.टी.आय. चं शिक्षण पूर्ण झाल्यावर…. कामानिमित्त मार्शल औरंगाबादला राहायला गेला. मार्शलचा दर महिन्याला पगार झाला की, प्रणाली त्याकडून पैसे घ्यायची. आणि घरी कोणतेही काम असले की, ती आणि तिचे मम्मी – पप्पा मार्शल ला घरी बोलावत. तो औरंगाबादवरून नाशिकला दर महिन्याला तिला भेटायला जात असायचा. आणि ती व तिच्या मम्मी – पप्पांच्या आग्रहाखातर त्यांच्याच घरी 8 – 10 दिवस मुक्कामाने राहत असायचा. तिचे मम्मी-पप्पा स्व:खुशीने प्रणाली आणि मार्शल ह्या दोघांना सोबत सोबत फिरायलाही पाठवाचचे. त्यांना कोणी विचारलं तर ते आमचा जावई आहे. प्रणालीचा होणारा नवरा आहे असं दस्तुरखुद्द तिचे मम्मी – पप्पा घराशेजारील लोकांना सांगत असत. आणि स्वत:हा नातेवाईकांच्या लग्न समारंभात त्याला घेऊनही जात. व आपल्या नातेवाईकांना होणारा जावई आहे असं नेहमी सांगत सुटत. डिसेंबर 2019 रोजी, मुंबईला प्रणालीच्या चुलत काकाचं लग्न होतं. तेव्हा आपल्या पप्पाला कळू न देता. तिने व तिच्या मम्मीने प्लान करून मार्शल ला मुंबईमध्ये लग्नाला बोलावलं. तेव्हा मार्शल तिथेही गेला…..

लग्न समारंभात मार्शल ला बघुन सर्वजण विचारायचे की, हे नवीनच कोण आहेत. तेव्हा प्रणालीचा होणारा नवरा आहे असं तिच्या मम्मी-पप्पांनी सर्व नातेवाईकांना सांगतले. आणि सर्वांशी तशी ओळखीही करवून दिली. नाशिकमध्ये घराशेजारील लोकांच्या घरी चाय/नाष्टा करायला मार्शल ला सोबत घेऊनही जायचे. अडीअडचणीला त्याच्याकडून पैशाची मद्दतही मागायचे. आणि हे काम मार्शल स्वखुशीने…., सरळ हाताने करत असे…..सन 2019 चा पावसाळा सुरू झाला आणि त्यांच्या घराची भिंत कोसडली. तेव्हा त्यांनी मार्शलकडून 10 हजार रुपये घेतले. स्वत:च कंपनीचं काम सोडून त्यांच्या घरी जाऊन….. त्यांच्या कोसळलेल्या घराची भिंतीच काम स्वत:हा करून दिलं त्याने. ते वेळोवेळी मार्शल ला घरी बोलावून त्याच्या हातून कामं करवून घेत असत. ते मार्शल कडून नेहमीच ते पैसे मागत…. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची बघुन मार्शल आपल्या घरच्यांना न कळवीता प्रणालीच्या घरच्यांना नेहमीच पैसे देत असे.

2020 मधील एप्रिल महिन्यात दोघांचं लग्न करायचं ठरवलं गेलं. त्यानुसार मार्शल तयारीलाही लागला आणि प्रणालीला लग्नात जे दाग – दागीने लागतात. ते सर्व दाग – दागीने मार्शलच्या आईने व मोठ्या ताईने घेवूनही ठेवले. त्याच्या घरचे सर्वजण लग्नाच्या कामाला लागलेले होते. पण मध्येच कोरोना व्हायरसने भारतात जन्म घेतला आणि संचारबंदीमुळे मार्शलच्याच काय तर देशातील सर्वाच्यांच लग्न समारंभावर पाणी फेरले गेले. कोरोनाच्या नावाने देशात लॉकडाऊन लावला गेला. आणि कामधंदा बंद पडला. मग तो मित्रांसोबत औरंगाबाद वरून चालत चालत आपल्या गावाकडे निघातो…. 10 -12 दिवसानंतर तो आपल्या गावाला सुखरूप पोहचतो. पण प्रणालीच्या मम्मी-पप्पांनी त्याच लॉकडाऊनचा फायदा उचलला…. नोकरीवाल्या मुलांचा शोध घेऊन…. त्यांना घरी आणुन प्रणालीला दाखवू लागले…. नोकरीवाल्या पाच – सहा मुलांना त्यांनी दाखवितात. प्रणाली त्या मुलांना नकारही देत होती. पण तिच्या मम्मी – पप्पांनी जबरदस्तीने तिला दुसऱ्या मुलांना दाखवीने सुरू ठेवले. हे सर्व दस्तुरखुद्द तिच्याचं मम्मीने दोन – चार वेळा मार्शल ला फोनवर सांगितलं…..आणि पुन्हा हेही सांगितलं की…., मुलं बघायला घरी आले तर प्रणाली तयारी करीत नाही. ती रडत बसती. मि लग्न करणार तर फक्त आणि फक्त मार्शल सोबतच करणार…. दुसऱ्या कुणाशीच नाही. ती बाकी मुलांचा विरोध करीत होती. पण संचारबंदी काळात त्या मार्शल ला काय करावं.. काय नाही. हे मुळीच कळत नव्हतं. कारण तो खुप लांब होता. लाकडाऊनमुळं गाड्याही बंद होत्या…. त्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. काही दिवसानंतर त्याला परत तिच्या मम्मीचा फोन आला. तेव्हाही तिची मम्मी त्याच विषयावर बोलु लागती. मग मार्शल तिच्या मम्मीला बोलतो की…., आपलं सर्व लग्नाचं जुळलेलं आहे. आणि प्रणाली माझ्यासोबतच लग्न करतो म्हणती आहे तर मग तुम्ही दुसऱ्या मुलांना घरी का बोलावता. व त्या मुलांसमोर तिला ऊभी कशाला करता. आमचं फक्त लग्न करायचं बाकी असतांना…. तुम्ही प्रणाली ला दुसऱ्या मुलांना घरी बोलावून दाखवत आहात हे योग्य आहे का ?.

तुम्हाला जर मी मान्य नसेल तर तुमचं आमचं जमत नाही असं मला स्पष्ट आणि डायरेक्ट सांगुन मोकळे व्हा ! म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळा. एकदा तिला विचारा आणि तुमचा फायनल डिसीजन कळवा मला….. ती माझ्यासोबत लग्न करायला तयार असेल तरीही ठीक आहे. आणि लग्नास तयार नसेल तरीही ठीकच आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ती जिथं म्हणेल तिथं खुशाल लावुन घ्या. मला काहीच हरकत नाही. आणि मी तिच्यावर किंवा तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. मला तुमचा फायनल डिसिजन कळवा. कारण तुम्ही तिकडे एखादं नोकरीवालं स्थळ बघून लग्न करून मोकळे व्हाल. आणि इकडे मात्र मी प्रणालीची वाटचं पहात बसणार….. हे सर्व मार्शल तिच्या मम्मीला बोलला. आणि यातच मार्शलचं चुकलं असं म्हणावे लागेल…. मार्शल सोबत लग्न जुळालेलं असताना. त्या दोघांचा प्रेमविवाह करुन देण्यास तिच्या मम्मी – पप्पां , मामा मामींची तयारी असताना देखील दुसऱ्या मुलांना दाखवायची गरज तरी काय होती ?आपण आपल्या मुलीचं लग्न एका ठिकाणी जोडलेलं असताना सुध्दा ‌… आपण इतर दुसऱ्या मुलांना आपली मुलगी दाखवतो का ? हाच प्रश्न मार्शलने तिच्या मम्मीला केला. तिच्या मम्मीने हे बोलणं तिच्या पप्पाला सांगितलं …. आणि मग लगेच चार दिवसानंतर प्रणालीचे पप्पा मार्शल ला फोन करुन. मार्शल समोर एक अट मांडतात. तेही लग्न तोडण्याचा उद्देश ठेवूनचं….. मार्शल तुम्ही लग्नाचा खर्च म्हणजे लग्नाच्या हॉलचा आणि जेवनाचा खर्च 50 हजार रुपये द्यायला तयार असाल तरच आम्ही लग्न लावून देण्यास तयार आहोत. जर तुम्ही 50 हजार रुपये दिले नाही तर माझी मुलगी म्हणजे तुमची प्रेमिका लग्नासाठी तयार नाही असं तुम्ही समजा. हे वाक्य प्रणालीचे पप्पा मार्शल ला बोलून मोकळे झाले आणि टाडकन फोन ठेवला. अगदी त्यादिवशीपासूनच प्रणाली आणि मार्शलचं बोलणं कायमचं बंद झालं. मार्शल सोबत बोलायचं नाही म्हणून प्रणालीवर तिच्या मम्मी-पप्पां, भाऊ, मामा यांनी दबाव टाकला. आणि यातच तर सर्वस्व वाया गेलं.

“शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल तर
कोणाला आपल्या प्रेमात पाडू नका !
शेवटी लग्न घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
कोणाच्या प्रेम प्रपोज ला होकार देऊ नका !
प्रेम कहाणीचा शेवट ब्रेकअपनेच करायचं असं
आधीपासूनच ठरवलेले असणार तर
प्रेम प्रकरणाला स्टार्ट करुच नका !
प्लिज कोणाच्या भावनांशी खेळु नका !”

दोन-चार नव्हे, तर तब्बल सहा वर्ष सोबत राहूनही शेवटी मार्शल सोबत नको तेच घडलं‌….‌ प्रणालीने ज्या रंगात मार्शल ला रंगवलं. त्या त्या रंगात तो रंगत गेला….. फक्त तिच्यासाठी ! तिने जे म्हटलं ते ते त्याने तिच्यासाठी केलं. दोघांच अफेअर सुरू असताना ती त्याला एकदा बोलली की, मार्शल आपण शारीरिक विधी (सेक्स) पार पाडू….. त्यावेळेस मार्शलने पस्ट शब्दात तिला नकार दिला. शारीरिक विधी पार पाडली तरचं प्रेम होतं का ? वासनांध प्रेम करुन….. सच्छा प्रेमाला लावू नको दाग…… नि:स्वार्थी प्रेमाचा हृदयी हवा भाव….. वासना सोडूनही प्रेम करता येतं असं मार्शलने तिला पटवून दिलं. पण ती ऐकायला मुळीच तयार नाही. सर्वच प्रियकर – प्रेयसी प्रेमामध्ये शारीरिक विधी पार पाडतात. मग आपण का बरं नाही करायचं. बाकीच्या प्रेमवीराप्रमाणेच आपणही शारीरिक विधी पार पाडू म्हणून तिने मार्शल समोर हट्टहास केला. आणि त्र्यंबकेश्वरच्या स्वराज लॉजवर मार्शल ला जबरदस्तीने घेऊन गेली. तेव्हा मार्शलने हार मानुन तिची तेही ईच्छा पुर्ण केली. त्यानंतर तिच्या सर्वच इच्छा – आकांक्षा मार्शल पूर्ण करीत आला. तिचं आणि त्याचं दोघांचं लग्न होणार म्हणूनच प्रणालीने तिचं सर्वस्व मार्शल ला बहालही केलं होतं. हे सगळं होऊनही शेवटी….. काय….? काय झालं ?ती खानदेशाच्या राजधानीत म्हणजे नाशिक सिटीमध्ये राहत होती आणि तो चंद्रपुरातील एका खेडेगावात.

मार्शल तुम्हाला लग्नानंतर नाशिकमध्येच राहावं लागणार असं तिच्या मम्मी – पप्पां , भाऊ आणि मामा – मामीचं म्हणनं होतं. तेही प्रेमाखातीर मार्शलने आणि मार्शलच्या घरच्या लोकांनी मान्य केलं होतं. लग्न करायचं एप्रिल महिन्यात ठरलं गेलं. पण मध्येच चिनच्या कोरोना नावाच्या बाळाचं भारतामध्ये आगमन झालं आणि त्याच कोरोनाने देशात महामारी सुरू करून सर्व जनतेच वाटोळं वाटोळं केलं. आणि यातच सर्व वाया गेले. याच कोरोना लॉकडाऊनचा पुरेपुर फायदा प्रणालीच्या मम्मी-पप्पांनी उचलला. आणि सरकारी नोकरीवाल्या मुलांचा पत्ता मिळाला तेव्हा त्यांनी आपली जबान बदलवीली.एक म्हण आहे हत्तीचे दात खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. हे त्यांच्यामुळे मार्शल ला कळून चुकलं.
काही दिवसानंतर प्रणालीच्या पप्पांने मार्शलच्या मोठ्या ताई – भाऊजींना फोन केला. त्यांच सविस्तर बोलणं झालं. तुम्ही लग्नाला 50 हजार रुपये देण्यास तयार असाल तर ठिक आहे. नाहीतर लग्न होणार नाही. हे ऐकून मार्शलचे ताई भाऊजी ठप्प झाले. पण मार्शलच्या आनंदासाठी….. प्रेमासाठी….. ताई – भाऊजीनी लग्नाचा खर्च म्हणून 50 हजार रुपये त्यांना देण्यास तयारही झाले.
ओके, तर मग ठीक आहे… तुम्ही 50 हजार रुपये देत आहात तर मग लग्न झालंच समजा….. ! आमची मुलगी लग्नाला तयार आहे किंवा नाही. हे मी तुम्हाला दोन दिवसानंतर कळवतो. असे बोलून तिचे पप्पा फोन ठेवतात. त्यानंतर तिन – चार महिने लोटून जातात पण प्रणालीच्या मम्मी-पप्पांचा फोन काही आला नाही आणि लग्नाचं काहीच कळवलं नाही. इकडे मार्शल ला भरवशावर ठेवून…. त्यांनी तिकडे दिवाळीमध्ये तीच लग्न करून मोकळे झाले.

ना जातीचा अडथळा.‌‌…. ना लेव्हलचा प्रश्न….. मार्शल सर्वसाधारण घरचा आणी ती गरिब घरची….. एका पत्र्याच्या घरात राहणारी…. प्रेमाखातर मार्शल तिच्या घरी गेला. पण तरीही बिनसले का ! आणि कुठे ?

प्रेमाच्या वाटेवर तो चुकलो कुठे ?
आज तिच्या सोबत घालवलेले क्षण आठवले की त्याचं मन झुरतं. दोघांच्या जोडीच्या फोटोकडे बघितलं तर मार्शल विचारात गुंग होतो.
आज ह्या अंगुलिमालाला तरी असं वाटते की, खरंच चूक केली त्या मार्शलने……. प्रणालीवर पवित्र आणि नि:स्वार्थी प्रेम करून…. हल्लीच्या वर्तमान काळात जगामध्ये जे प्रेमाच्या नावाखाली लफड्याचे फॅड सुरू आहे. वासनांध होऊन आपलं शिक्षण….. आपलं करियर सोडून पळून जाण्याचा जो प्रकार सर्रासपणे सुरू आहे. तोच प्रकार योग्य वाटतो आहे मला….. कारण तिच्या मम्मी-पप्पांनी आपल्या मुलीवर दबाव टाकून…. त्या मार्शलपेक्षा उच्च स्तरावरील मुलगा बघून आपल्या मुलीला लग्नाच्या बोहल्यावर चढवून दिले.
तरीही मार्शल गप्प गुमान बसलेला होता. कारण त्यांने पवित्र आणि नि:स्वार्थी प्रेम केलं होतं तिच्यावर म्हणून….. प्रणाली आणि मार्शल दोघांनी मिळून घेतलेल्या वचनांचा चकनाचुर झाला. म्हणूनच त्याने तिच्यावर किंवा तिच्या परिवारावर जबरदस्ती केली नाही. कारण जबरदस्ती करून जोडलेलं कोणतही नातं ते चिरकाल टिकत नाही. आणि ते नातं अर्ध्या वाटेवरच समाप्त होतं. हे मार्शल ला चांगलंच माहिती होतं. मार्शल ला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला ती तयार झाली. म्हणूनच मार्शलने तिच्या लग्नात लुडबुड घालण्याचा जराही प्रयत्नही केला नाही. तिला लग्ना दरम्यान शायद मार्शलचीच भिती वाटत असणार…. म्हणूनच प्रणालीने मार्शल सोबतचे सर्वच प्रकारचे संबंध तोडले. ही वस्तुस्थिती जाणून तिने मार्शल ला गिफ्ट दिलेल्या सर्वच भेटवस्तू मार्शलने तिला परत केल्या….. त्यावरही तिचा विश्वास नाही. कारण सच्चा प्रेमवीराला नको असतात…. गिफ्ट दिलेल्या वस्तू ….. जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर मग त्या व्यक्तीने दिलेल्या भेट वस्तू जवळ ठेवायच्या तरी कशाला….. नि:स्वार्थी आणि हृदय तोडून प्रेम केलं होतं मार्शलने तिच्यावर….. म्हणूनच तिने दिलेल्या भेटवस्तूंची मार्शल ला गरज वाटली नाही. म्हणून सर्व भेटवस्तू तिला परत केल्या मार्शलने….. फक्त टाईमपास करणारेच प्रेमवीर एखाद्याने दिलेल्या भेटवस्तू घेण्याचं काम करतात. सच्छा प्रेमवीरांना भेटवस्तूची आवश्यकता नसते. कारण मार्शलने खरं प्रेम केलं होतं तिच्यावर……

म्हणूनच तो मनात कशाची भीती न ठेवता. नाशिकला जाऊन तिच्या मम्मी – पप्पांकडे लग्नाची रितसर मागणी घातली होती. सन 2015 पासून ते दोघंही एकमेकांवर प्रेम करीत आले. प्रणालीवर प्रेम करित असताना मार्शल ला अनेक मुलींनी प्रपोज केलं. पण त्यांने त्या सर्वच मुलींना धुडकावून लावलं होतं. प्रणाली त्याच्यापासून 600 – 700 कि.मी. लांबवर राहत होती. पण मार्शल तिच्यावर मनापासून…. आपलं हृदय तोडून तिच्यावर प्रेम करीत होता. म्हणूनच मार्शलने त्या मुलींना धुडकावून लावलं. प्रेम एकावरच करायचं असतं आणि तेही हृदय तोडून…… प्रेम करणारे तर आयुष्यात हजारो भेटतात पण शेवटपर्यंत साथ निभावणारा फक्त एकच असतो. ती जेव्हा भेटायला बोलवायची तेव्हा तेव्हा तो त्याच्या गाववरून 700 की.मी. चं अंतर पार करून तिला भेटायला जायचा. तिच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करीत आला. पण आज ती बदललेली आहे‌…… मार्शलने ज्या प्रणालीवर प्रेम केलं. पण आज ती प्रणाली राहिलेली नाही. तिने आणि तिच्या मम्मी-पप्पांनी मनात स्वार्थी भावना ठेवून मार्शलचा फक्त नी फक्त कामापुरताचं वापर करून घेतला. असे मला तरी वाटतंय…..
अगं वेडे तू बिनधास्त दुसऱ्याशी लग्न कर…… त्या मार्शल ला काहीच हरकत नाही आणि तो कसली हुजर तक्रारही करणार नाही. नोकरीवाला, श्रीमंत मुलगा बघून तू त्याच्याशी लग्न केलीस . पण एक गोष्ट सदैव तुझ्या लक्षात असू दे ! “माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो, समाधानी असला पाहिजे. मग तो झोपडीत का असेना !”
तुझ्या घरी नोकर-चाकर असतीलही कदाचित….. आणि कदाचित तू गादीवर लोळण घेत बसशील…. पण त्याच गादीमधून तुला काटेच काटे बोचतील…… जेव्हा तुझा नवरा तुला स्पर्श करेल ना ! तेव्हा मात्र तुला त्या मार्शलच्या मधुर स्पर्शाची जाणीवही होईल. हेही मी चांगलंच ओळखतो. तू पश्चातापाच्या आगीत जळत जाशील आणि इकडे तो पोकळ हसून स्वतःचे ध्यान वळविण्याचा प्रयत्न करत बसेल….
प्रणाली तुझ्या अवतीभवती इतर व नवीन लोकांचा घोळका असल्यामुळे…. सद्या तुला त्या मार्शलची गरजही भासणार नाही. पण काही कालांतराने हा लोकांचा घोळका जेव्हा पसार होईल….. तेव्हा मात्र तुला कळेल की तू काय गमावलं….. तेव्हा मात्र तू नियतीला दोष देत बसू नकोस…. तर स्वतःमध्ये झाकून बघ….! तुझं तुलाच उत्तर मिळेल….‌. तू काय गमावलं हे तुला आज नाही कळणार…… पण वेळ आल्यावर नक्कीच तुला कळेल…..!प्रणाली तु मार्शल ला मिळाली नाहीस तर मार्शल संपुन जाईल….. असा तुझा विचार असेल कदाचित….. पण ते कदापी शक्य नाही. प्रणाली तू दुसऱ्या मुलाशी लग्न करून तिकडे मौज-मजा करशील…. मग तो का ! बरं तुझा विचार करात बसावा. तुझ्या आठवणीत डुबुन राहावा. ऊद्या तो सुद्धा एखादी बरी वाईट मुलगी बघुन लग्न करणार…. आणि संसार थाटणार….

तुझ्याविना त्याने जीवन जगणे सुरू केलेले असेल….. दोन-चार फोटो होते, तुझे अन् त्याचे जोडीचे…… आज त्या फोटोंना फाडून फेकले त्याने….. प्रणाली घमंड होता तुला की, तो तुझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणून…. पण तुझ्या त्या घमंडाला आज तोडलं मार्शलने…… आतमधून खरंच तुटला होता त्यावेळी….. पण तो स्वत:ला तितक्याच उम्मेदीने सावरलेही…… मार्शलवर ओढवलेली ती वेळ केव्हांच निघून गेली…. पण बदललेली माणसं आयुष्यभर त्याला लक्षात राहतील….. प्रणाली तु मार्शल सोबत लग्न करून , थाटणार होतीस संसार….. तुझं अन् त्याचं लग्न होण्याआधीच , तू मार्शलचा मोडलीस संसार…..!

अशावेळी कवी सुरेश भटांची कविता मला आठवते……
विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही
पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी तू पंख माझे, पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे, झाले कैक कावे
जळेल झोपडी माझी, अशी आग ती ज्वलंत नाही
येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी
अडथळ्यांना भिऊन अडखळणे, हे माझ्या पावलांना पसंद नाही !

सबर कर बंदे !
ये मुसीबत के दीन भी गुजर जायेंगे !
आज जो तुझे देखके हस्ते है !
वो कल तुझे देखते ही रह जायेंगे !
त्याग दी सब ख्वाईशे…..
कुछ अलग करने के लिए !
सिद्धार्थ गौतम ने खोया बहुत कुछ
भगवान बुद्ध बनने के लिए…..!

✒️अंगुलिमाल मायाबाई उराडे(मु.पोष्ट,बेंबाळ,ता.मुल,जिल्हा.चंद्रपूर)मो:-9689058439