चार्वाकवनास येथे भन्ते शाकुबोधी यांची भेट

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनीधी)

पुसद(दि.29जानेवारी):- तालुक्यातील सांडवा मांडवा रोडवरील चार्वाकवनास सुन्नखडी तालुका जिल्हा एदिलाबाद येथील, जपानमध्ये २५ वर्षे बौद्धधम्माचे प्रशिक्षण घेतलेले झेन Monk भन्ते शाकूबोधी हे दि.३० जानेवारी २०२२ रविवार रोजी चार्वाकवनास भेट देणार आहेत.

भन्ते शाकूबोधी ‘ संविधान संसद ‘ या शिर्षकाखाली एदिलाबाद जिल्ह्यात संविधान जागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या चार्वाकवन भेटीचे औचित्य साधून संविधान जागृती कार्यक्रमाची ‘ व्याप्ती आणि गती ‘ वाढविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी चार्वाकवनात दि. ३० जानेवारी २०२२ रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड -१९ च्या सर्व नियमाचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी, सर्वांनी मास्क लावून यावे.
साईनिटाझर आणि आसन व्यवस्था कोविड-१९ च्या नियमाप्रमाणे करण्यात आली आहे.

तरी सर्व उपासक-उपासिका यांना विनंती की,
कार्यक्रमास आणि आयोजित स्नेह भोजनास उपस्थित रहावे.
असे आवाहन चार्वाक वनाचे संस्थापक अध्यक्ष,धम्मभुषण अॕड.अप्पाराव मैन्द यांनी केले आहे.