राष्ट्रियकुत बॅके मार्फत तात्काळ दिव्यागाना कर्ज देण्यात यावे..

32

🔸प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे निवेदन

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.29जानेवारी):-जिल्ह्यातील दिव्याग यांना कोरोना सारख्या महामारीत त्यांचे हालाचे बेहाल होत असल्याने त्यांनी जिवन कसे जगावे .ह्या साठी मार्च 2022पुर्वी दिव्यांगाचा राखिव निधी पुर्णपणे खर्च करण्यात यावा .प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना ही वेळोवेळी दिव्यागाचा विचार करुण आंदोलन करतात .त्या अनुषंगाने अपंगांचे जिवन जगणे सुकर होईल म्हणुन शासनाने बरेच शासन निर्णय अंमलात आणले..परंतु त्या निर्णयाचे पालन शाखा प्रबंधक .तसेच निगडीत अधिकारी करत नाही.म्हणुन प्रहार जनशक्ती पक्ष चे संपर्क प्रमुख चंदु खेडकर.तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे शहर व जिल्हा प्रमुख शाम राजपुत यांच्या व अपंग बांधवाच्या उपस्थितीत प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले..

प्रमुख मागण्या .दिव्याग कायदा 2016 अधिनियम नुसार.जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मध्ये दिव्यागाना राजकीय आरक्षण द्यावे.2,जिल्हा परिषद बिज भाडवल योजना समिती वर प्रत्येक सघटणेचे पदाधिकारी समितीवर देण्यात यावे.3.दिव्यांग पाच टक्के राखिव निधी मध्ये मोटरराईज सायकल चे नियोजन करावे..व इतर दिव्यांगाच्या जिवन कल्याणसाठी नियोजन करण्यात यावे यासाठी निवेदन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी तसेच आयुक्त साहेब महानगर पालिका मध्ये देण्यात आले यावेळी..विजय बाबर .गजानन फिरके.ओम गिरी.सिध्दार्थ कार्दक.अशोक बनोटे.रश्मी काकडे.प्रदिप रघुते.मोठ्या संख्येने दिव्याग उपस्थिती होते.