मोर्शी येथे विविध उपक्रम राबवून आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस साजरा !

35

🔸५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; २१ अपंग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.3फेब्रुवारी):-येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार देवेंद्र भुयार मंडळा तर्फे आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला . कोरोनाच्या संकटामुळे अनेक रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कोरोना विरुद्धच्या लढ्यात पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्यामुळे याच पार्श्वभूमीवर, आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस रक्तदान करून विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मोर्शी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये रक्तदान शिबिर, अपंग बांधवांना सायकल वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना मदत यासह आदी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आल्यामुळे मोर्शी तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला.मोर्शी येथील कामगार भवन येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवासा निमित्य ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून, २१ अपंगांना सायकली वाटप, युवती व मतांचा सत्कार, विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विविध समाजपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला,मोर्शी येथील कामगार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात ‘सोशल डीस्टसिंग’ चे काटेकोरपणे पालन करत अनेकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, नगराध्यक्ष मेघना मडघे, नगरसेवक डॉ प्रदीप कुऱ्हाडे, माजी न प उपाध्यक्ष मोहन मडघे, नगरसेविका क्रांती चौधरी, प्रीती देशमुख, विद्या ढवळे, दीक्षा गवई, नाईम खान, दिलीप गवई, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू साऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, निलेश महल्ले, घनश्याम कळंबे, विलास ठाकरे, विनोद ढवळे, धनंजय अमदरे, विपुल हिवसे, अंकुश ठाकरे, शुभम तिडके, गजानन वानखडे, त्रिशूल गेडाम, शुभम पकडे, मयूर राऊत, निखिल चिखले, शेर खान, प्रदीप इंगळे, गौरव गुल्हाने, नितेश आसोलकर, अमोल केचे, अमर नागले, पंकज बेल, स्वराज तट्टे, प्रणित चोपडे, विवेक शहाणे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.