यंग चांदा ब्रिगेड तर्फे गणेश जयंती निमित्त लाडू वाटप

82

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.5फेब्रुवारी):-आज दि. 4 फेब्रुवारी 2022 रोज शुक्रवार ला, गणेश जयंती निमित्त वार्ड क्र. 1, विठ्ठल मंदिर देवस्थान, घुग्घूस येथे मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थे तर्फे लाडू वाटप करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिर येथील गणेश मुर्तीची पुजा श्री गणेश आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित श्रीगणेश भक्तजनांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी कार्यक्रम यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या बहूजन समाज महिला आघाडीच्या घुग्घूस शहर अध्यक्ष सौ. उषाताई आगदारी, आदिवासी महिला आघाडी घुग्घूस शहर अध्यक्ष सौ. उज्वलाताई उईके, सौ. नितुताई जैस्वाल, जनाबाई निमकर, सौ. मायाताई मांडवकर, सौ. संध्याताई जगताप, सौ. गीताताई बोबडे, सौ. कवीताताई देशकर, सौ. स्मिताताई कांबळे, यशोधराताई पाझारे, सौ. ललीताताई शेवने आणि समस्त यंग चांदा ब्रिगेड सदस्यगण उपस्थित होते.