बैरमबाबा मंदीर परिसरातला पंचर चे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक

33

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.9फेब्रुवारी):-दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता दरम्यान गले असता फिर्यादी नामे मुलकु ईलयत अली वय(२७) दुकानाचे कुलुप तुटलेले दिसले. व दुकानाचे साहित्य कॉप्रेसर मशीन, बोल्ट मशीन, हिटर मशीन,३ नग जुने टायर डिस सहित, ४नग खाली टायर,लोखंडी डिक्स जुने,नगद ६०००रू,एक हातोडी व रॉड असा एकूण ७४००० माल अज्ञात आरोपी ने रात्रीचा वेळी दुकानाचा कुलुप तोडुन आत प्रवेश केले, अशा फिर्यादीवरून तोंडी रिपोर्ट नोंद करून तपास घेतला.फिर्यादीच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलीसांनी कलम ४६१,३८० (३४) गुन्हा नोंद करून पोलीसांनी गुन्हा तपासात घेतला घुग्घुस पोलीस निरीक्षक बी.आर. पुसाटे यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले,गुन्हे पथकाचे मनोज धकाते,रंजित भुरसे, नितीन मराठे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वापरलेल्या वाहणाच्या टायरचे मार्क बघून वाहन हे टाटा एस मालकवाहक दिसुन आल्याने घुग्घुस येथील गांधी चौकातील सिसीटिव्ही फुटेच तपासले असता आरोपी शमशाद मंजूर अंसारी (२५) रा.वार्ड क्रमांक २ घुग्घुस हा दुचाकीने जात असतांना व त्यामागे टाटा एस मालकवाहक वाहन चोरीच्या मुद्देमाल घेवुन जाताना दिसुन आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आरोपी मंजूर शाह दालु शाह (४०) रा.डोंगरे पेट्रोल पंप जवळ गडचिरोली जिल्ह्य़ात नेल्याचे सांगितले.त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले गुन्हे शाखेचे रंजित भुरसे,नितीन मराठे,यांनी गडचिरोली येथे जाऊन आरोपी मंजूर शाह यास अटक केली व दोन्ही आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त केला.