इंदापूर येथे बीड जिल्ह्यातील संभाजी शेळके यांचा सन्मान

32

✒️प्रतिनिधी विशेष(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.१२फेब्रुवारी):- नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि जय हनुमान बहुउद्देशीय संस्था इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने केतकेश्वर विद्यालय, निमगाव केतकी ता. इंदापूर येथे युवकांना संसदेचं कामकाज कसं चालतं याची प्रचिती यावी याकरिता संसदेतील मंत्रिमंडळाची प्रतिकृती “युवा संसद – 2022” या कार्यक्रमात तयार करण्यात आली होती.या “युवा संसद – 2022” कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांना संसदेच्या कामाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली.

या कार्यक्रमाच्या वेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचे सचिव श्री. ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेले बीड जिल्ह्यातील संभाजी शेळके यांनाही सामाजिक कार्य आणि रुग्णसेवा याबद्दल सन्मानचिन्ह देऊन मा. प्रकाश कुमार मानोरे – राज्य संचालक नेहरू युवा केंद्र, महाराष्ट्र व गोवा, मा. यशवंत मानखेडकर – उपसंचालक नेहरू युवा केंद्र, पुणे व मुंबई, डॉ. शशिकांत तरंगे अध्यक्ष – यशवंत प्रहार संघटना, मा. तानाजी मारकड अध्यक्ष – जय हनुमान बहुउद्देशीय संस्था यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.