भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर आणि बैरमबाबा मंदिरात 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी

26

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.17फेब्रुवारी):-नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर व बैरमबाबा मंदिरात 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

यासोबतच घुग्घुस शहरात विविध ठिकाणी नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी किसान सेल जिल्हाध्यक्ष कॉग्रेस रोशन पचारे, अनुसूचित जिल्हाध्यक्ष काँग्रेस पवन आगदारी, काँग्रेस नेते लखन हिकरे उपस्थित होते.