राजे धर्मराव हायस्कूल अड़पल्ली (माल) येथे शिवजयंती निमित्त विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

27

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

आष्टी(दि.20फेब्रुवारी):-राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे दिनांक 19.2.2022 रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक नारायण बोरकुटे हे होते.आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी शिवाजी महाराजांचे चांगले गुण विद्यार्थ्यांना सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक नीलकंठ शहारे यांनी केले राजेन्द्र लाकडे यांनी आपल्या भाषणतुन विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जीवनाबद्दल सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन मेघश्याम भोयर यांनी केले.व आभार जाइद शेख यांनी मानले याप्रसंगी सुनील गुंडावर ,रथीन्द्र सरकार,जाईद शेख, यादव मडावी, दिपक नाइकवार, कल्पना गुंडावार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते.