छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची जयंती नवेगाव पांडव येथे साजरी

32

🔸झुंड मे तो मुगल आते थे,अकेले लढणे का नाम ही शिवाजी था – ॲडव्होकेट शर्मिला रामटेके

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.21फेब्रुवारी):-नुकतीच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले यांची जयंती नवेगाव पांडव येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ग्राम पंचायत नवेगाव पांडव येथे अभिवादन करण्यात आले.त्यानंतर हनुमान मंदिर देवस्थान समोर युवा मित्र परिवार यांच्या पुढाकाराने गावात मोठा कार्यक्रम घेण्यात आला.ह्या कार्यक्रमांचे अध्यक्ष सरपंचा अँड शर्मिला रतनकुमार रामटेके तर उपाध्यक्ष दिवाकर नवगडे गुरूजी, उद्घाटक म्हणून संतोष रडके, गावातील भारतीय आर्मीत सैनिक असलेले नवेगाव पांडव येथील संदिप पांडव साहेब आणि बिंदू रडके साहेब हे दोघे ह्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने झांकी काढून शोभा यात्रा काढण्यात आली. ह्या भोभा यात्रेची सुरुवात सैनिक उपस्थित सैनिकांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आली. गावातील प्रतिष्ठित नागरिक शशीकांत रहाटे , सदाशिव बोरकुटेजी,अनिल मेश्रामजी, पांडुरंग रामटेके , ज्ञानेश्वर विठ्ठलजी बोरकुटे, बाबुराव पांडव, ग्राम पंचायत सदस्य ‌रितेश राजेश्वर पांडव, कल्पना ताई सुरेश नवघडे, मिराताई मानिकजी मशाखेत्री, निजंना ताई सोनटक्के,कमलाकर पांडव, आणि नवेगाव पांडव येथील प्रतिष्ठित नागरिक युवा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निमित्ताने ॲडव्होकेट सरपंचां शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरूणांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आजकालची तरुण पोरं शिवाजी राजे शहाजी राजे भोसले यांची कापी करतात ,दाडी -मुछ वाढवतात,कानात कुंडल घालतात . शिवाजी महाराजांचे विचार सुध्दा डोक्यात ठेवा. अंगीकृत करा.एखादी मुलगी जर रात्री उशिरापर्यंत बाहेरून घरी जात असताना काही मुल तीच्या मागे लागले आणि तुम्ही तिथूनच जात आहात तर त्या मुलीला बोला ताई तु माझ्या गाडीवर बस मि तुला घरी सोडून देतो. तेव्हा खरी महाराजांची साजरी होईल ‌.तुम्ही सर्वप्रथम शिक्षणा कडे लक्ष द्यावे . कारण शिक्षणा शिवाय पर्याय नाही .

शिक्षण सुटले असेल तर काम करा दोन पैसे कमवायला शिका. आई वडीलांना मदत करा. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे शिक्षण घ्या. झुंड चा भाग बनू नका कारण “झुंड मे तो मुगल आते थे,अकेले लढणे का नाम ही शिवाजी था . “छत्रपती शिवाजी राजे भोसले हे वाघ होते. वाघासारखे जगायला शिका.तेव्हा खरी महाराजांची साजरी जयंती साजरी होईल.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वप्नील दिवाकर नवगडे गुरूजी यांनी केले.आभार अतुल दादाजी पांडव यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा मित्र परिवार नवेगाव पांडव यांनी खुप परिश्रम घेतले.