देवाडा येथे शितल कर्णेवार यांच्या ‘मौनाचे अस्तर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

38

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.21फेब्रुवारी):-झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रामीण) शाखा राजुरा च्या वतीने राममंदीर सभागृह देवाडा येथे कवयित्री शितल कर्णेवार यांच्या ‘मौनाचे अस्तर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी अरूण झगडकर , उद्घाटक मुमताज अब्दुल जावेद सभापती पं.स. राजुरा , प्रमुख अतिथी जावेद अब्दुल मजीद उपसरपंच देवाडा, दिलीप पाटील गझलकार, भाष्यकार म्हणून प्रा.डाॕ.विठ्ठल चौथाले जेष्ठ साहित्यिक चामोर्शी तसेच बल्लारपूर येथील कवयित्री प्रीती जगझाप ,कवीसंमेलनाचे अध्यक्ष डाॕ.किशोर कवठे आणि कवी रामकृष्ण चनकापुरे लाभले होते. कवयित्री शितल कर्णेवार यांच्या पहिल्या ‘मौनाचे अस्तर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

झाडीबोली साहित्य चळवळीने अनेक नवोदित साहित्यिक पुढे येत असून याच चळवळीने अनेकांना साहित्यात नवी ओळख निर्माण करून दिली. भाषा समृद्ध करायचे असेल तर बोलीचे संवर्धन करणे साहित्यिकांचे कर्तव्य असल्याचे अरूण झगडकर यांनी प्रतिपादन केले. प्रमुख भाष्यकार डाॕ.विठ्ठल चौथाले यांनी शितल कर्णेवार यांचा कवितासंग्रह स्वतंत्र प्रतिभेचा असून ग्रामीण साहित्यात दमदार प्रवाह असल्याचे सांगत मौनाचे अस्तरतील अंतरंग उलगडले .प्रीती जगझाप यांनी साहित्यातून समाजमन जागृत करण्याची इच्छाशक्ती निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.कवयित्री शितल कर्णेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी झाडीबोली जिल्हा शाखेच्या वतीने शितल कर्णेवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उद्घाटक मुमताज अब्दुल जावेद यांनी कवयित्री शितल कर्णेवार यांच्या साहित्य निर्मितीचे भरभरून कौतुक केले.

दुसऱ्या भागात जेष्ठ साहित्यिक डाॕ.किशोर कवठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी रामकृष्ण चनकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कविसंमेलनात संतोषकुमार ऊईके,प्रशांत भंडारे,लक्ष्मण खोब्रागडे,मनिषा पेंदोर,नागेंद्र नेवारे,सुनील पोटे, वृंदा पगडपल्लीवार, जयंती वनकर, संगिता बांबोळे,अनिल आंबटकर,सुनील बावणे,अर्जुमनबानो शेख,मंजुषा दरवरे,संजय कुनघाटकर,योगेश धोडरे,श्वेता चंदनकर,हर्षा झाडे,मिथुन शेंडे,बंडू पाचोडे आदींनी कविता सादर केल्यात. सूत्रसंचालन डाॕ.अर्चना जुनघरे आणि प्रविण तुराणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ताटवाकार संतोष मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळाच्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.