रक्तविर सेना फाउंडेशनच्या, सैनीकांची रुग्णाच्या मदतीला मोलाची धाव..

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23फेब्रुवारी):- आज च्या तारखेला रक्तविर सेना फाउंडेशन रुग्णाच्या मदतीला ब्रम्हपुरी तालुक्यात मोलाची भूमिका मांडत आहे. तसेच विद्यार्थी युवा पीढ़ीला स्व:ता रक्तदान करुन रक्तदानाविषयी महत्वाचे संदेश देणारे जिल्हा परिषद शाळा कुरुड़चे शिक्षक सूरज तूपट यांनी आज रुग्ण मीराबाई झूरी यांना फ्रेश रक्तदान केला.

आज पर्यंतचा त्यांचा दशक (10) पूर्ण झाला.व रक्तदानाच्या कार्याला वेगाची चिंगारी देण्यासाठी रक्तविर सेना फाउंडेशनचे निहाल ढोरे, माया सिंग बावरी, प्रणय ठाकरे, प्रफुल ढोक, संदीप दर्वे, रूपम शिऊरकार, संदीप कामड़ी, पवन बेदरे, सत्यपाल गोठे, हर्षल फाये व इतर सैनिक ब्रम्हपुरी तालुक्यात प्रचार-प्रसार करत आहेत.