जिल्हा अग्रणी बँकेची जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

36

✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सातारा(दि.23फेब्रुवारी):-जिल्हा अग्रणी बँकेची जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली.या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, रिझर्व्ह बँकेचे नरेंद्र कोकरे, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, महाराष्ट्र बँकेचे अचंल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, लघु उद्योगांमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकते, यासाठी लघु उद्योगांचे कर्ज प्रकरणे मंजुर करावेत. शासनाच्या विविध विभागांकडून विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे बँकांकडे पाठविले जातात तेही मंजुर करण्यात यावेत.जिल्ह्यातील बचत गटांकडून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनांची निर्मिती केली जाते. या बचत गटांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. तसेच प्रत्येक शाखानिहाय पिक कर्ज उद्दिष्टे दिले आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत केल्या.यावेळी कर्ज वाटपात उत्कृष्ट काम केलेल्या बँक शाखांचाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.