युवानेते राधेश्याम भैय्या धस यांंच्या वाढदिवसानिमित्त जमलेला जनसमुदाय ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती – माजी आ. साहेबराव दरेकर

28

🔹राधेश्याम भैय्या धस यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24फेब्रुवारी):-गेली दोन वर्षे संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. आष्टी तालुक्‍यातही कोरोनाचे रुग्ण वाढले होते. या महाभयंकर आजारांमध्ये रक्ताचे नातेवाईक जवळ येत नव्हते परंतु आष्टी तालुक्यामध्ये ध्रुव हॉस्पिटलच्या माध्यमातून युवानेते राधेश्याम भैय्या धस व त्यांचे मेहुणे डॉ. सुदाम जरे यांनी चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा करत आधार दिला. त्यांनी केलेल्या या कार्याचा आवर्जून उल्लेख केला जातो.आज याठिकाणी युवानेते राधेश्याम भैय्या धस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय हे राधेश्याम भैय्या धस यांच्या सामाजिक कार्याची पावतीच असल्याचे प्रतिपादन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले.

आष्टी तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच उद्योग, व्यवसाय क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करणारे युवानेते राधेश्याम भैय्या धस यांच्याकडून युवकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. आष्टी येथे युवानेते राधेश्याम भैय्या धस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आ. सुरेश धस यांच्या हस्ते आष्टी तालुका दुध संघाजवळ आयोजीत कार्यक्रमात केक कापण्यात आला.यावेळी अनेकांनी राधेश्याम भैय्या धस यांचा सत्कार करुन अभिष्टचिंतन केले. यावेळी राजेंद्र दाहातोंडे, राजेंद्र लाड, किशोरनाना हंबर्डे, प्रकाश कवठेकर, अमरराजे निंबाळकर, नामदेव राऊत, रंगनाथ धोंडे, अनिलतात्या ढोबळे, भागचंद झांजे, बद्रीनाथ जगताप, विजय गोल्हार, माजी आ. साहेबराव दरेकर यांची भाषण झाले.

यावेळी अजय दादा धोंडे, आदिनाथ सानप, डाॕ. सुदाम जरे, अमोल भंडारी, जयदत्त भैय्या धस, सागर भैय्या धस, काकासाहेब नलावडे, काकडे दाजी, अशोक गर्जे, दादा शिंदे, राहुल काकडे, पोपट घुले, सुनिल रेडेकर, सचिन लोखंडे, बळीराम गिते, स्वप्निल घुले, महेश शिंदे, दत्ताभाऊ काकडे, तायराम गळगटे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ,आष्टी तालुका पत्रकार संघ, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि फेटा बांधत भविष्यात यशस्वी होण्यासाठी आणि उद्योग – व्यवसाय क्षेत्रांमध्ये तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत यश मिळवावे, अशा शुभेच्छा याप्रसंगी दिल्या. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समाजधुरिणांनी ही युवा नेते राधेश्याम भैय्या धस यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.