धक्कादायक.! बहीण-भावाचा दगडाने ठेचून क्रूरतेने हत्या

27

🔺बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.24फेब्रुवारी):-जिरेवाडी (ता.परळी) येथे वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना आज गुरुवारी (ता.२४) उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे व शुभ्रा ग्यानबा मुंडे असे मृत भाऊ व बहिणीचे नावे आहेत.

जिल्ह्यातील जिरेवाडी शिवारात सटवा ग्यानबा मुंडे (वय ६८, रा.जिरेवाडी) यांची शेती आहे. त्यांच्याबरोबर त्यांची बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) या राहत होत्या. त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली आहे. हत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.