दिग्रस येथे बौद्ध धम्म उपवर-वधु परिचय मेळावा

37

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.24फेब्रुवारी):-येथील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने पडगिलवार ले -आऊट येथील योगा भवनामध्ये बौद्ध धम्म उपवर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतीचा उत्तम प्रतिसाद मिळाला.या मध्ये २०५ वधु-वरांनी परिचय करून दिला.मेळाव्याचे उद्दघाटन प्रसिद्ध वक्त्या डॉ. प्रा .अनीता कांबळे पुसद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी परिचय व विवाह मेळावे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्रस पंचायत समिती चे माजी सभापती मिलींद मानकर होते.प्रमुख अतिथी प्रकाश गायकवाड दलीत मित्र एस टी भगत उपस्थित होते.आयोजन समितीचे राजेंद्र शेळके, गणेश रोकडे, सदानंद आठवले, विनायक देवतळे, उध्दव अंबुरे, किशोर कदम, महादेव धुळध्वज, डॉ वाल्मिक इंगोले,रवी तुपसुंदरे उपस्थित होते.

आयोजन समिती चे संघटक प्रा. मधुकर वाघमारे यांची मेळावा आयोजनाची भूमिका मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्वला मानकर यांनी केले. वधु-वरांचे संचलन एकनाथ मोगले, प्रदिप नगराळे, उत्तम मनवरव अनुसया वाठोरे यांनी केले.मेळाव्या करिता कार्यवाहक समीतीचे भिमराव नगराळे, अॅड दत्ता खंदारे, यशवंत भरणे, रमेश वहीले, देविदास खंदारे, चिंतामण मनवर, उत्तम इंगोले, गौतम भोवते, तुकाराम उबाळे, पुरुषोत्तम मेश्राम,प्रा त्रिपाल राहूलगडे,, रमेश हातागळे, किसन उबाळे, मुरलीधर कांबळे, संजय खंदारे, राजेंद्र वाघमारे, सुभाष मोहोड, सदानंद उमरे,धनु मस्के, प्रदिप खंदारे, अशोक कांबळे, नंदू गुजर यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्याला वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड, हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील व किनवट ,माहूर, उमरखेड ,महागाव, पुसद, घाटंजी, राळेगाव, कळंब,नेर, महागाव,दारव्हा,मानोरा, मंगरुळपीर, वणी,देवळी इत्यादी तालुक्यातील वधु-वरानी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ व दिग्रस मधील सर्व बौद्ध बांधव यांनी सहकार्य केले.सर्व बौद्ध बांधवांनी भोजन दानाचा आस्वाद घेतला.सरणताई गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.