टिक टॅक टो किड्स फॅशन शो चे आयोजन

29

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.1मार्च):- टॉट्स मॅक्झिन तर्फे अडीच ते दहा वयोगटातील मुलांसाठी टिक टॅक टो फॅशन शो चे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी ची प्राथमिक फेरी नुकतीच पुण्यात घेण्यात आली तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टॉट्स मॅगझिनच्या लवलीन अलीमचंदानी यांनी किड्स फॅशन शो बाबत सविस्तर माहिती दिली या वेळी शो मार्गदर्शक भावना शर्मा, ब्रँड सल्लागार गौरी शाह, प्रोविलॅक मिल्क च्या शलाका बजाज, मनीषा रुणवाल, मॉम ब्लॉगर च्या गीतिका खनुजा उपस्थित होत्या.

लवलीन अलीमचंदानी म्हणाल्या की, कोविड ची दोन वर्ष हा लहान मुलांसाठी सर्वात कठीण काळ होता. एरवी शाळे व्यतिरिक्त असणारे छंद वर्ग क्रीडा मैदानं बंद असल्यास कारणाने मुलांच्या मनाला मरगळ आली होती. आता कोविड निर्बंध शिथिल झाल्या कारणाने मुलांच्या घराबाहेरील उपक्रमांना आता सुरवात झाली आहे त्यासाठीच मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देश्याने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आजकाल फॅशन डिझायनर्स मोठ्यांच्या बरोबरीने लहान मुलांच्य कपड्यांचे सुध्दा विविध प्रकार उपलब्ध करतायेत त्यांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमाद्वारे व्यासपीठ मिळवून दिले आहे. वेगवेगळ्या प्रसंगी घातल्या जाणाऱ्या विविध पोशाखां चे सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मधे पारंपारिक, पाश्चिमात्य, सहज घालता येण्याजोगे पोशाख याचा समावेश असणार आहे. मुलांना रॅम्पवॉक साठी मार्गदर्शन करणाऱ्या भावना शर्मा म्हणाल्या की, लहान मुलांसाठी अभिनय आणि जाहिरात या क्षेत्रात खूप संधी आहेत आम्ही मुलांना स्टेज वरचा वावर, कॅमेरा फेसिंग, विविध पोझ, संवाद यासाठी मार्गदर्शन करतो एकत्र सारावा मुळे मुलं आत्मविश्वासाने कोणत्याही प्रकारच्या पोशाखात व्यासपीठावर सहज वावरु शकतात.