गेवराईत भारतीय धनुर्धर मिहीरनितीन अपार यांचा सत्कार

29

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.5मार्च):-येथील विठ्ठल रुक्माई व संत सेना महाराज मंदिर येथे बुलढाणा येथील रहिवासी जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भाग भाग घेऊन भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे यशस्वी खेळाडू धनुर्धर मिहिर नितीनराव अपार यांचा महाराष्ट्र नाभिक महामंडळ गेवराई शहर शाखेच्या वतीने आर बी अट्टल महाविद्यालयचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र बरकसे योग गुरु प्रशिक्षक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक कार्य करणारे कर्मचारी नाभिक एकता महासंघ मराठवाडा विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर चातूर महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा संपादक श्री सुनील पोपळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे शिक्षक कॅप्टन श्री शंकरराव सूर्यवंशी सर श्री सुधाकरराव गोरे बीड जिल्हा सचिव श्री दशरथराव पंडित श्री रामेश्वरराव राऊत गेवराई विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष श्री अशोक गायकवाड ह भ प राजेंद्र म पंडित बीड जिल्हा धनुर्धर प्रशिक्षक श्री जवंजाळ श्री शंकरराव पंडित रविद्र वखरे हरि पंडित राहुल वखरे अपार यांचे वडील श्री नितीन राव अपार सौ अपार इत्यादी समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चातुर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील पोपळे यांनी केले