देवसरी येथील 99 दलित कुटुंबांना पुनर्वसन करा- आमदार संतोष बांगर यांची मागणी

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.8 मार्च):-तालुक्यातील देवसरी या गावातील 99 दलित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे.देवसरी गावाची मागील 15 वर्षे पासून पुनर्वसन करा..! ही मागणी प्रलंबित आहेत. यात कोणताही शासन निर्णय झालेला नाही.या गावामध्ये सन 2006 ला पूर आल्याने 99 दलित कुटुंबांना रस्त्यावर आले आहे.आजपर्यंत ह्या कुटुंबाला कोणतीही शासनाची मदत किंवा आर्थिक सहकार्य लाभले नाही.जिल्हा अधिकारी यवतमाळ आणि तहसीलदार उमरखेड यांनी 3 हेक्टर जमीन मध्ये पुनर्वसन करण्यात यावे.अशी मागणी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. संतोष बांगर साहेब यांनी विधानसभेत केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी प्रत्युत्तर देतांना या सर्व संबंधित पुनर्वसनाचा विचार करून पुन्हा अर्ज मागून घेऊ…!आणि एक महिन्याच्या आत त्याला मंजुरी देण्यात येईल अशी माहिती विधानसभेत दिली.याबद्दल देवसरी गावातील 99 दलित कुटुंबांनी आमदार महोदय मा.संतोष बांगर साहेब व त्यांचे P.A. भीमराव सावतकर यांचे सौ. मिनाक्षी चंद्रमणी सावतकर (सरपंच) व चंद्रमणी सावतकर (सरपंच प्रतिनिधी), गजानन देवसरकर (उपसरपंच) तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले आहे.