पळशी फाटा येथे रस्त्यासाठी “रस्ता-रोको” आंदोलन

29

🔸उपविभागीय अभियांत यांना धारेवर धरले

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11मार्च):-उमरखेड ते पुसद या राज्यमार्गावरील पोफाळी ते अंबाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची झालेली दयनिय अवस्थेवर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने वसंत नगर ते पोफाळी व पळशी ते अंबाळी फाट्या पर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्थेवर दोन वेळा निवेदन देत रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली होती.

मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सा. बांधकाम विभागाने कोणतंच काम केले नाही त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपसत आज दिनांक 11मार्च 2022 शुक्रवारला पळशी फाट्यावर आज रास्ता रोको आंदोलना करत सा.बा विभागा विरूध्द एल्गार पुकारला होता.

पुसद- उमरखेड 213 या राज्य रस्त्यावरील पोफाळी ते अंबाळी फाट्या पर्यंत रस्त्याची मागील तीन वर्षापासून दैयनीय अवस्था झाली आहे.

हा राज्य रस्ता आहे की? पांदन रस्ता आहे..! अशी खराब अवस्था वसंत नगर ते पोफाळी पळशी ते अंबाळी पर्यतच्या रस्त्याची झाली आहे.

या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी दशा या राज्यरस्त्याची झाली आहे.
रस्त्यावरून खड्डे चुकवत प्रवास करतांना दुचाकी धारकांना आपला जीव मुटीत धरून प्रवास करावा लागतो.

दरम्यान खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वाहन चालकांचे अपघात होऊन गंभीर दुखापत सुध्दा झाली आहे.

या रस्त्याचे काम करून रस्ता तात्काळ चांगला व्हावा यासाठी दिनांक 2 फेब्रुवारीला पाहिले निवेदन दिले मात्र या विभागाने नेहमी प्रमाणे काम होईल असे आश्वासन दिले पंधरा दिवस उलटूनही साधे गड्डे सुद्धा भरले नाही परत 24 फेब्रुवारीला दुसरे निवेदन देत 11 मार्चला रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तेव्हा पासून या रस्त्यावर एक टोपले गिट्टी सुद्धा टाकण्यात आली नाही.

म्हणून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष निकेश गाडगे यांच्या नेतृत्वात हा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा आले होते.

यावेळी दिनेश हनवते, रविंदभाऊ राठोड, गजानन राठोड, राजू गायकवाड, प्रज्वल हरणे, शुभम कळलावे, शेख सर, हुसेन फिरोज खान पठाण, विरेंन डोंगरे, सुमेध हरणे, प्रफुल बरडे, भोलेनाथ व्यवहारे, संग्राम गुल्हाने, बालाजी सूर्यवंशी, सुहास खंदारे, संग्राम भालेराव, रवी खडसे, सोमनाथ आडे, मंगेश ढोले, मंगेश हुपाडे, कुणाल हरणे, चांदभाई कृष्णा जाधव, मनोज कांबळे, शिवाजी वाकडे, रवी बरडे सचिन जाधव शिवशंकर सुरोशे, पुरोगामी अविनाश धोंगडे, देशमुख यांनी व अनेक सर्व गावांतुन कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

आंदोलन स्थाळी सर्वानी घोषणा देवून प्रामुख्याने हा रस्ता झालाच पाहीजे?सा. बांधकाम विभागाचा निषेध करत या आंदोलन ठिकाणी आजुबाजुला स्वताची दुचाकी चारचाकी वाहने लावून रस्ता रोखून धरला. त्यानंतर साधारणता 2 तास रस्त्याची वाहतूक बंद होती.

त्यानंतर या ठीकाणी सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या खड्यावर विश्लेषण त्याठिकाणी उमरखेड येथून आलेले सार्वजनिक बां. विभागाचे उपविभागीय अभियंता चेके यांच्या सोबत रस्त्या संबंधीत चर्चा करताना त्यांना धारेवर धरले.त्यांना ठोस आश्वासन न देता लेखी अश्वासन थातूर मातूर देण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित आंदोलंकानी पत्र घेतले नाही.यापेक्षा उग्र आंदोलनाचा इशारा दिला. पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांनी तगडा बंदोबस्त दिल्यामुळे व कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.