व्यावसायिकांना नगरपरिषद ने केलेली कर भरणा सक्तीची अट शिथिल करा — नगरसेवक सतीश जाधव

49

🔸मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

🔹व्यवसायिक व नागरिकांसाठी सरसावले नगरसेवक सतीश जाधव

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि:-26 जून)मागील तीन महिन्यापासून देशात कोरोना कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना देशात लॉकडाऊन आहे .परंतु चिमूर नगर परिषद ने व्यवसायिक व नागरिकांना कोणतेही कागदपत्रे लागत असल्यास कर भरणा सक्तीचे केले असल्याने नागरिक व व्यावसायिक यांच्यात संतापाची लाट पसरली असून याची दखल नगरसेवक सतीश जाधव यांनी घेऊन ती कर भरणा जाचक अट शिथिल करण्यात यावी या संदर्भाचे निवेदन मुख्याधिकारी खेवले यांना देऊन कर भरणा अट रद्द करून शिथिल करण्याची मागणी केली आहे .

नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारक व व्यवसाय करणाऱ्याना नाहरकत पत्र देण्यासाठी सन 2019 -20 ,2020 – 21 या वर्षाचे कर भरणे सक्तीचे केले आहे .तसेच व्यवसायिक धारकांना सुद्धा व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र साठी एक हजार रुपये शुल्क आकारणार आहे . परंतु देशात कोरोना कोविड ची महामारी सुरू असून लॉक डाऊन मुळे व्यवसाय , रोजगार बंद आहे .आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे रोजगार नसल्याने उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे . यामुळे नगर परिषद ने नागरिकांना कर भरणा ची अट रद्द करून त्या अटीत शिथिलता करण्यात यावी तसेच व्यवसायधारकांचे सुद्धा दुकाने बंद होती तेव्हा व्यवसाय नाहरकत प्रमाण पत्र शुल्क जास्त प्रमाणात घेण्यात येत असल्याने सुद्धा कमी करण्यात यावे .
नगर परिषद च्या शासन प्रशासन कडे लक्ष वेधीत भाजपचे नगरसेवक सतीश जाधव यांनी नागरिक तथा व्यवसायधारकांच्या हितासाठी पुढाकार घेत ते सरसावले असून त्यांनी मुख्याधिकारी खेवले यांना निवेदन दिले असून येणाऱ्या नप च्या सभेत चर्चा व निर्णय घेण्यास पुढाकार घेतला आहे .