गणेश भोसले यांची रि. पा. ई. च्या खटाव तालुका अध्यक्ष पदी निवड

35

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17मार्च):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा कार्यकारणी ची बैठक दि .16 मार्च 2022 रोजी दु.2 वा. सर्किट हाउस वडुज या ठिकाणी सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू यांचे अध्यक्ष ते खाली पार पडली, या बैठकीत वडुज नगरपंचायत निवडणुकीत पक्ष विरोधी काम केले बद्दल पदावरुन निलबिंत केलेले राजेन्द्र जगताप व कुणाल गडंकुश याना पुन्हा सन्मान पुर्वक पक्षात घेणेत आले.

राजेन्द्र जगताप याना जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून तर कुणाल गडंकुश याना त्यांच्या पूर्वीच्या पदावर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ति करनेत आली. यावेळी वंचित बहुजन आघाड़ी चे प्रफुल्ल होवाळे ,आल इंडिया पैंथर जिल्हा अध्यक्ष अक्षय घाडगे, शिवसेना शाखा प्रमुख विक्रमराज डोई फोड़े यानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला , यांचे पक्षाचे वतीने जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड़ बापू यानी बुके देऊन स्वागत केले,यावेळी खटाव तालुका अध्यक्ष पदी गणेश भोसले यांची जिल्हा अध्यक्ष यांच्या परवानगी ने जिल्ह्याचे सरचिटणीस समाजभूषण- आप्पासाहेब गायकवाड़ यांनी घोषित केले व जिल्हा कार्यकारणी च्या बैठकी ची बातमी जिल्हा सरचिटणीस यांचे शिवाय कोणीही प्रसिद्ध करू नये अशी सर्वाना सूचना देनेत आली, यावेळी अशोकराव गायकवाड़ बापू म्हणाले कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्तिचे पालन करावे येणाऱ्या नगरपालिकेच्या व जिल्हा परिषद निवडणूक साठी तैयारी करावी असे आव्हान करनेत आले.

तसेच सर्वानी मतभेद विसरून कामाला लागा वे असेही आव्हान करनेत आले, यावेळी वाई खंडाला मतदार विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब गायकवाड़, जिल्हा सरचिटणीस समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड़ , प. महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोल मदने, उपाध्यक्ष हेमंत दोरके, जिल्हा उपाध्यक्ष अजित नलवड़े जिल्हा यूवक चे अध्यक्ष जयवंत वीरकयदे,जिल्हा कामगार आघाडी चे अध्यक्ष निलेश गाड़े जिल्हा पर्यावरण आघाड़ी चे अध्यक्ष नितिन आवळे, जिल्हा वाहतूक आघाडी के अध्यक्ष एयाज शेख,जिल्हा सचिव शंकर लोकरे, कराड उत्तर चे अध्यक्ष उत्तम कांबळे, दक्षिण चे कार्याध्यक्ष राजेश गवली, महिला आघाडी च्या नेत्या गौतमी मसणे माधुरी टोनपे, ,तालुका वाई अध्यक्ष श्रीकांत निकालजे, जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकड़े, शिवाजी रणदिवे, सातारा शहर अध्यक्ष अक्षय कांबळे, युथ चे उपाध्यक्ष वैभव गायकवाड़, मयूर बनसोडे, गणेश गायकवाड़, प्रतीक गायकवाड़, बाबर, आसिफ बेपारी, सचिन कांबळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अभिजित बोकडे, सचिन भंडलकर, विशाल उमापे, युवराज रणदिवे, शरद नलवडे, अजिंक्य वाघमारे शेकडो कार्यकर्ते हजर होते शेवटी खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले यानी आभार मानले,