चवदार तळे

85

जगण्यास बळ दिले तु भिमराया ,
तोडल्या जातिच्या अन् परंपरेच्या बेड्या .
तवा उंचावल्या मनुवादी भुवया .
महाड क्रांतिचा शुर सेनापती तु भिमराया .
नव्हती पाणी पिण्याचीही मुभा ,
तु ओंजळीने पाजीले पाणी आम्हा .
जगण्यास बळ दिले तु भिमराया .
घेतले तु कुलबा येथे अधिवेशन ,
दिली संघर्षाची ,हक्काची जाणीव करूणी .
क्रांतिची मशाल घेऊनी पुढाकार घेतला तु भिमराया .
जगण्यास बळ दिले तु भिमराया .
आनंदि झाले सर्व बहुजन ,
ना आनंद झाला त्या मनुवाद्यांना .
धर्म तोडला ,तळे बाटले या संतापाने आले धाऊनी तुमच्या अंगावरती .
पण तरी तु डगमगला नाही भिमराया .
दिला चोख दंड त्यांना कायद्याच्या मार्गाने जेलमध्ये सक्तमजुरीचा .
जगण्यास बळ दिले तु भिमराया .
तुझे ते एक पाऊल इतिहासालाही कलाटणी देते भिमराया .
संघर्ष करण्यास बळ देते आम्हा तु भिमराया .

✒️विशाल इंगोले(अजातशत्रू)अमरावती