पुरवठा विभागाचा आशीर्वाद-रेशन दुकानदारांनी संपूर्ण धान्य विकले काळ्या बाजारात!

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25मार्च):-शहरातील भगवती चौकातील बालाजी मंदिराच्या बाजूस संत जनाबाई कुकुट पालन सहकारी संस्था अतंर्गत चालणाऱ्या रेशन दुकानदारानी मार्च महिण्यात लाभार्थ्याना वाटपासाठी आणलेले धान्य पूर्णच काळ्या बाजारात विकलेले आसताना दुकानदारावर कुठलेही कार्यवाही न करता उलट अॕडवान्स धान्य देण्याच्या हालचाली पुरवठा विभाग करत आसल्याने चर्च्या होताना दिसते.

शहरातील भगवती चौकातील बालाजी मंदिराच्या बाजूस आसलेल्या चेअरमन संत जनाबाई कुकुट सहकारी संस्था अतंर्गत चालणाऱ्या रेशन दुकानातुन लाभार्थी नेहमीच परेशान करून धान्या वाटप करत असतो असे आसताना देखील गंगाखेड तहसिल पुरवठा विभाग सातत्याने रेशन दुकानदाराची पाठराखण करीत आसल्याचे दिसत आहे.सदरील दुकानदाराचा तक्रारी गंगाखेड पुरवठा विभागात धुळखात पडून आसुन पुरवठा विभाग मात्र दुकानदाराची पाठराखण करीत आसल्याचे दिसत आहे. चेअरमन संत जनाबाई कुकुट पालन सहकारी संस्था अतंर्गत रेशन दुकानदारास शासकीय धान्य गोदामातुन मोफत 53 क्विंटल 47 किलो वाटपाचे धान्य 9 मार्च रोजी रेशन दुकान पोहच देण्यात आले तर दि.10 मार्च रोजी दरमाहा रेगुलर धान्य 68 क्विंटल 73 किलो असे 122 क्विंटल 20 किलो वाटपासाठी देण्यात आलेले आसताना रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना आज पर्यत धान्यच वाटप केले नाही.

मार्च संपत आला तरी ई-पाॕश मधून एकही धान्य वाटप पावती बाहेर आलेली नाही इतर रेशन दुकानातुन 99% टक्के धान्य वाटप झालेल्या आॕन लाईन नोंदी दिसत आसताना पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार इंदोरीकर मात्र गप्प बसलेले दिसत आहेत संपूर्णपणे धान्य काळ्या बाजारात विकल्याने रेशन दुकान बंद आसल्याने लाभार्थी दररोज दुकाना समोर धान्य घेण्यासाठी तासनतास बसत आहे.याबाबत अनेकांनी तहसिलदार यांना सदरील दुकान बंद आसल्याचा तक्रारी पण केल्या पण सदरील रेशन दुकानदाराची पाठराखणच होताना दिसत आहे.तर रेशन दुकानदार हा पुरवठा विभागाकडून धान्य मिळाले नसल्याचा बोलत आहे.