ट्रक आणि स्कूल बस चा भीषण अपघात…

34

🔸12 विद्यार्थ्यांसह चालक,वाहक,आणि एक सायकलस्वार जख्मी…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1एप्रिल):- शहरापासून जवळच असलेल्या नवेगाव परिसरात आणि एक मालवाहू ट्रक ने पंचर अवस्थेत उभी असलेल्या स्कूल बस ला मागून जोरदार धडक दिल्याने 12विद्यार्थी सह आणि स्कूल बस चे चालक,आणि वाहक जख्मी झाले आहे . जख्मी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 मुलांच्या डोक्याला मार लागलेला होता. या अपघातात ट्रक वाहनाने स्कूल बसला जोरदार धडक दिल्याने स्कूल बस पुढे जाऊन रोडच्या बाजूने चालत आलेल्या एका सायकलस्वार व्यक्तीला धडकून त्या व्यक्तीला गंभीर जख्मी केले आहे.ट्रक वाहन चा चालक गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला होता.
या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की,स्कूल बस ला धडक दिल्याने,स्कूल बस रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर पालटली होती.या अपघातात ट्रक स्कूल बस ला धडक दिल्यानंतर वीज खांबाला धडकला होता,तसेच तो वीज खांब पूर्णपणे वाकून गेला होता.या अपघातामुळे वीज विभागाचे जवळपास 25 हजाराचे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती,घटनास्थळ पंचनामा करून स्कूल बसच्या जख्मी वाहनचालकाला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रक चा चालक हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली आहे.रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या गाड्यांमुळे वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने, या मार्गावर असे भीषण अपघात रोखण्यासाठी,पोलिस आणि आरटीओ विभागामार्फत काहीतरी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.