आरमोरी येथे एक दिवसीय शिंपी समाज संघटन मेळावा संपन्न

37

🔹आत्मविश्वास हेच आपल्या यशाचे गमक- राजेश वडपल्लीवार (शिंपी समाज राज्य परिषद अध्यक्ष)

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

आरमोरी(दि.3एप्रिल):- शिंपी समाज आरमोरी च्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून एक दिवसीय शिंपी समाज संघटन मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरमोरीतील ज्येष्ठ समाज बांधव गणपतराव वडपल्लीवार से.नि.मुख्याध्यापक , कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंदुजी वडपल्लीवार , अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना आरमोरी विशेष अतिथी म्हणून राजेश वडपल्लीवार, अध्यक्ष शिंपी समाज राज्य परिषद, डाॅ.गुणवंत वडपल्लीवार , सदस्य शिंपी समाज राज्य परिषद अनिल दिकोंडवार आरमोरी ,श्रीमती गुंफा ताई वडपल्लीवार ,श्रीमती वेणूताई वडपल्लीवार , कृष्णाजी लाचरवार, केशवजी नंदगीरवार ,श्री शैलेश कणॅवार , नरेंद्र कोतकोंडवार , प्रमोद गटलेवार या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होती.

या वेळी सौ.नयना गुणवंत वडपल्लीवार यांना पीएचडी मिळाल्याबद्दल शिंपी समाजाचे वतीने गौरव करण्यात आला. तसेच चंदुजी वडपल्लीवार यांची संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समाजाचे वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. तर श्रीमती वेणूताई वडपल्लीवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.या प्रसंगी राजेश वडपल्लीवार यांनी शिंपी समाजाचे संघटन मजबूत होण्यासोबतच शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही यासाठी समाजातील मुलामुलींनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यासाठी त्यांनी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दृष्टांत देऊन त्यांचे पासून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला.

या प्रसंगी शिंपी समाज आरमोरी तालुका कार्यकारिणीची पुनः रचना करण्यात आली.
अध्यक्ष :- श्री प्रमोद मधुकर गटलेवार, सचिव-श्री दिलीप देवनाथ वडपल्लीवार, कोषाध्यक्ष :-श्री नरेंद्र जनादॅनजी कोतकोंडवार, सहसचिव निलेश केशव नंदगीरवार, महिला प्रतिनिधी – सौ.ज्योती काटरपवार
सदस्य :-सौ. अनिता अनिल दिकोंडवार, सौ.निलिमा प्रदिप वडपल्लीवार, सौ सारीका कर्णावार
सौ.गायत्री ईजगीरवार यांची प्रामुख्याने सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी समाजांतील बंधू भगिनींनी आपले विचार व्यक्त केले. शि‌क्षण, आरोग्य आणि व्यवसायाचे यशस्वी व्यवस्थापन यावर मौल्यवान विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन कु.सौख्या वडपल्लीवार , प्रास्ताविक डाॅ.गुणवंत वडपल्लीवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिंपी समाज बांधवांनी टिम वर्क म्हणून काम केले.