पोलीस हवालदाराचा ड्युटी साठी येत असताना पोलीस स्टेशन आवारात गांधील माशांनी चावा घेतल्याने मृत्यू

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.3एप्रिल):- पोलीस स्टेशनचे एका पोलीस हवालदाराचा ड्युटी साठी येत असताना पोलीस स्टेशन आवारात गांधील माशांनी चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार यशवंत आनंदा भोई बक्कल नंबर 2365 यांना दिनांक 2 एप्रिल रोजी 8:30 वाजता दिंडोरी पोलीस वसाहत येथून दिंडोरी पोलीस स्टेशन आवारात येत असताना, पोलीस स्टेशन आवारात त्यांच्या तोंडाला, डोक्याला, मानेला, पाठीवर, छातीवर, पायाला, गांधील माशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने, त्यांना क्षीरसागर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

व तेथून ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केल्यावर, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे करत आहेत