रखडलेले मानधन त्वरित अदा करा

27

🔹पुसद येथील उमेद महिला कल्याणकारी मंडळाची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7एप्रिल):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत संसाधन व्यक्तीचे गेल्या १२ महिन्यापासून थकीत मानधन तातडीने अदा या मागणीसाठी पुसद येथील शेकडो उमेद कॅडर कल्याणकारी मंडळाच्या महिलांनी दि.६ एप्रिल २०२२ रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन पाठविण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सर्व समूह संसाधन व्यक्ती कोविड-१९ परिस्थितीपासून अभियानाचे काम सातत्याने करीत आहेत.कोविड-१९ चा सर्वत्र प्रादुर्भाव असताना देखील अभियानाच्या सर्व समूह संसाधन युक्तीने ग्रामीण भागात केलेल्या मास निर्मिती कार्याची अवघ्या महाराष्ट्रात दखल घेण्यात आली तसेच ग्रामीण भागातील कोविड -१९लसीकरण मोहीम उमेद महिला समूह संसाधन व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात सहभाग देऊन शासनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला.गेल्या १२ महिन्यापासून समूह संसाधन व्यक्तीचे थकीत असताना पण उमेदच्या कामात खंड पडू दिला नाही. विविध मागण्यासाठी उमेदच्या महिलांनी माननीय उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात

उमेद समूह संसाधन व्यक्तीच्या मानधनात किमान ५ ते ७ हजार रुपये वाढ करण्यात यावी गेल्या १२ महिनेपासून समूह संसाधन व्यक्तीचे थकित असलेले मानधन तात्काळ अदा करण्यात यावे तसेच मानधन अग्रीम स्वरूपात ग्रामसभा प्रभाग संघात कायमस्वरूपी ठेवण्यात यावे अभियानात सी.एस.सी.अंतर्गत भरती न करता आमच्या समूह संसाधन व्यक्ती मधील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवाच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी द्यावी तसेच सर्व समूह संसाधन व्यक्तीचे कौटुंबिक आरोग्य विमा काढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यात यावे. तसेच आर .एफ./सी .आय .एफ/ व्ही. आर.एफ व उपजीविका निधीत किमान ४०% वाढ करून देण्यात यावे तसेच ग्रामसंघ प्रभागासाठी स्वतंत्र कार्यालय करिता सुसज्ज इमारत बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावे

अश्या प्रकारच्या अनेक मागण्या घेवून संपूर्ण पुसद उमेद कॅडर कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षा गोकर्णा पाईकराव, उपाध्यक्ष अनिता राठोड, सचिव यासमीन दरणे, सहसचिव रमा कांबळे, कोषाध्यक्ष दैवशाला डोळस, संपर्क प्रमुख दिपमाला पंतगे,ज्योती कांबळे प्रशिध्दीप्रमुख शांता खंदारे, मार्गदर्शक बबिता सोनटक्के सदस्य प्रिति आरगुलवार,मालु राठोड, अंजली डोंगरे,सविता गुळवे,अरूणा राठोड,सुनिता आडे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.